पाली : राजस्थानच्या पाली जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घडना घडली आहे. बरलाई गावानजिकच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. मार्बलने भरलेला एक कंटेनर अनियंत्रित होऊन जवळून जाणाऱ्या एका कारवर पडला. त्यामुळे ही कार अक्षरश: चपटी झाली. या अपघातात कारमघील चौघांचा दबून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारमधील लोक जोधपूरहून अहमदाबादच्या दिशेनं निघाले होते. (Container collapses on moving car in Rajasthan’s Pali district, Four died)
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कालूराम रावत यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने त्यांनी कंटेनर बाजूला केला. पोलिसांनी कंटेनर बाजूला करुन कारमधील मृतदेह बाजूला काढले. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पालीवरुन सिरोही राष्ट्रीय महामार्गावर बारलाई गावाजवळ कार RJ 19 ऊओ 9226 पालीवरुन सिरोहीला निघाली होती. तेव्हा गुजरात नंबर GJ 12 BT 3880 कंटेनर ट्रोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न कारवर जाऊन पडला.
या कंटेनरमध्ये मार्बल भरण्यात आले होते. हा कंटेनर कारवर पडताच कार पूर्णपणे दबली. त्यामुळे कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत हे जोधपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी सर्व मृतांची ओळख पटवली आहे. राजस्थान पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
इतर बातम्या :
पुण्यात हायवेवर लूटमार, सराईत बुलेटचोर सैराट जाधव ताब्यात
टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या हरेक महिन्याच्या बिलापासून मुक्तता, आता 160 चॅनेल मिळवा मोफत
Container collapses on moving car in Rajasthan’s Pali district, Four died