नवी दिल्ली : पतंजली कंपनीच्या कोरोनावरील औषधावरुन जोरदार वाद तयार झालाय. रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनील या औषधाचं लाँचिंग केलं. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर थेट WHO नेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय (Controversy over Patanjali Corona Medicine Coronil Ramdev Baba IMA and WHO).
आयएमएने (IMA) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असा अवैज्ञानिक दावा कसा केला जाऊ शकतो असाही सवाल केलाय. तसेच त्यांच्या उपस्थितीत WHO प्रमाणपत्राविषयी सरळसरळ खोटं सांगण्यात आलं. यावर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर द्यावं, अशीही मागणी करण्यात आली.
.@WHO has not reviewed or certified the effectiveness of any traditional medicine for the treatment #COVID19.
— WHO South-East Asia (@WHOSEARO) February 19, 2021
आयएमएने म्हटलं, “भारताचे आरोग्यमंत्री म्हणून तुमच्या समोर अशाप्रकारे खोटं सांगणं किती योग्य आणि तर्कसंगत आहे. अशाप्रकारच्या अवैज्ञानिक औषधाचं लाँचिंग करणं कितपत बरोबर आहे. आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत तरीही ते अशाप्रकारच्या औषधाला प्रोत्साहन देत आहेत हे किती नैतिक आहे. हे औषध म्हणजे लोकांनी फसवणूक असून पतंजलीचा दावा थेट जागतिक आरोग्य संघटनेने खोडल्याने देशाचीही जागतिक पातळीवर नाचक्की झालीय.”
जर कोरोनील खरंच नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण करत असेल तर सरकार कोरोनाल लसीकरणावर 35 हजार कोटी रुपये का खर्च करत आहे? असाही सवाल आयएमएने विचारला.
कोरोनीलवरुन झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीने यावर स्पष्टीकरण दिलंय. पतंजलीचे आचार्य बालक्रिष्ण म्हणाले, “आम्ही काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. आमच्या औषधाला मिळालेलं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेलं नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागाने दिलं आहे. WHO नं आमच्या औषधाला मंजूरी दिलेली नाही किंवा नाकारलेलं देखील नाही. WHO जगभरातील लोकांचं चांगलं आरोग्य सांभाळण्यासाठी काम करते.”
We want to clarify to avoid confusion that our WHO GMP compliant COPP certificate to Coronil is issued by DCGI, Government of India.
It is clear that WHO do not approve or disapprove any drugs.
WHO works for building a better, healthier future for people all over the world. pic.twitter.com/ZEDPdWy0tg— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) February 19, 2021
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे, “पतंजलीच्या कोरोनील औषधाचं प्रमोशन करताना केंद्रीय आरोग्यमंत्री देशाची अडचण होण्यापासून वाचवतील, अशी मला आशा आहे. माझा आयुर्वेदात विश्वास आहे, मात्र पतंजलीने कोरोनाविरोधात खात्रीशीर उपचार शोधल्याचा दावा करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फसवणूक आहे. देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.”
I hope our Health Minister stops embarrassing the nation with such claims to promote Coronil.
I strongly believe in Ayurveda but to claim it as a WHO guaranteed cure against COVID &endorse it, is nothing but cheating as well as misleading the nation. https://t.co/keneIA0pyM— Priyanka Chaturvedi (@priyankac19) February 21, 2021
हेही वाचा :
बाबा रामदेवचं कोरोना औषधही बाजारात, लॉचिंगला गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री !
पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
Coronil | महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही, गृहमंत्र्यांचा रामदेव बाबांना थेट इशारा
व्हिडीओ पाहा :