Corona : कोरोनाचा कहर पुन्हा वाढला, केसेसमध्ये झाली पुन्हा वाढ, तज्ज्ञांनी काय दिला इशारा ?

| Updated on: Apr 06, 2023 | 1:58 PM

Corona vaccine : देशभरात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांहून अधिक झाली आहे. अनेक राज्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

Corona : कोरोनाचा कहर पुन्हा वाढला, केसेसमध्ये झाली पुन्हा वाढ, तज्ज्ञांनी काय दिला इशारा ?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (corona cases) कहर वेगाने वाढू लागला आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 चे विक्रमी 5,335 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्याच्या घडीला देशात 25 हजारांहून अधिक सक्रिय (active cases) रुग्ण आहेत. अनेक राज्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्येही हॉस्पिटलायझेशन (hospitalization) वाढत आहे. कोविडचा वाढता धोका लक्षात घेता, तज्ञ सर्व लोकांना कोविड लसीचा बूस्टर डोस (booster dose) घेण्याचा सल्ला देत आहेत. विशेषत: वृद्ध नागरिक धोकादायक रोगांचे रुग्ण यांसारख्या उच्च जोखीम असलेल्या लोकांनालसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेल्या लोकांमध्ये कोविडचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत या लोकांनी लसीचा तिसरा डोस घेणे महत्वाचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, यावेळी विषाणूचा प्रसार वाढत आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते लोक याचे बळी ठरू शकतात. अर्ध्याहून अधिक लोकांनी तर बूस्टर डोसही घेतलेला नाही. अशा परिस्थितीत व्हायरस संसर्ग होण्याची शक्यता असते. लसीचा कोर्स पूर्ण केल्याने कोविडची गंभीर लक्षणे टाळता येतात.

शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

हे सुद्धा वाचा

कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण थोडे वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इतर काही आजार असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केले जात आहे. यापैकी अनेकांनी लसीचा कोर्स पूर्ण केलेला नाही, म्हणजेच बूस्टर डोस घेतलेला नाही. बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी सुमारे 9 महिने किंवा एक वर्षापूर्वी दुसरा डोस घेतला होता, परंतु अद्याप तिसरा डोस घेतलेला नाही. पण या कालावधीत कोविड विरूद्ध तयार झालेली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, त्यानंतर व्हायरसची लागण होण्याची शक्यता वाढते. उच्च जोखीम असलेल्या लोकांना कोविडमुळे जास्त धोका असतो. अशा स्थितीत त्यांनी तिसरा डोस घेतला पाहिजे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लसीकरणामुळे कोविडची गंभीर लक्षणे टाळता येतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो. रुग्णालयांमध्ये इतर आजारांचे जास्त रुग्ण दाखल होत असल्याने त्यांनी संरक्षणासाठी लसीकरण करावे. लस घेण्यात कोणतेही नुकसान नाही. उलट लस घेतल्यामुळे कोविडविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होते, ज्यामुळे गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत.

काही महिन्यांपूर्वी सरकारने तिसऱ्या डोस घेण्यासाठीचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत कमी केला होता. लोकांना वेळेवर बूस्टर घेता यावे म्हणून हे करण्यात आले होते पण बऱ्याच लोकांनी तिसरा डोस घेतला नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने लस घेण्यास काही नुकसान नाही.

केसेसमध्ये का होत आहे वाढ ?

कोविडच्या उत्परिवर्तनामुळे (म्युटेशन) नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. XBB.1.16 हा व्हेरिअंट वेगाने पसरत आहे. लोकांना याची लागण होत आहे. या प्रकाराची लक्षणे सौम्य असली तरी संसर्गाची शक्यता जास्त आहे. नवीन व्हेरिअंट व्यतिरिक्त, हवामानातील बदल आणि लोकांची बेफिकीर वृत्ती ही देखील प्रकरणे वाढण्याची कारणे आहेत. लोकांना कोविडपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. मास्क वापरणे आणि हाताच्या स्वच्छतेची काळजी घेणे, अत्यंत महत्वाचे आहे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने होत आहे वाढ

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 5 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. आठ महिन्यांनंतर इतक्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या सर्व राज्यांमध्ये कोविडचा सकारात्मकता दरही वेगाने वाढत आहे.