मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) कोरोना विषाणूने नवे स्ट्रेन (प्रकार) आढळून येत असल्यानं दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. अशावेळी लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकने मोठा दावा केलाय. कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस परिणामकारक आहे. भारत आणि UK मध्ये आढलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही कोव्हॅक्सीन प्रभावी (covaxin efficacy) असल्याचा दावा भारत बायोटेककडून करण्यात आलाय. ( Covaxin of Bharat Biotech effective on new strain of corona)
प्रामुख्याने B.1.617 आणि B.1.1.7 कोरोना व्हेरिएन्ट्स हे भारत आणि UK मध्ये आढळले आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएन्ट्सवरही कोव्हॅक्सीन प्रभावी असल्याचं भारत बायोटेकने रविवारी म्हटलंय. कोव्हॅक्सीनचा वापर B.1.1.7 (UK मध्ये आढळलेला स्ट्रेन) आणि व्हॅक्सीन स्ट्रेन (D614G) च्या न्यूट्रिलायझेशनध्ये काही बदल दिसून आला नसल्याचं भारत बायोटेकने म्हटलंय.
Covaxin gets international recognition yet again, by scientific research data published demonstrating protection against the new variants.Yet another feather in its cap??@PMOIndia @nsitharaman @drharshvardhan @MoHFW_INDIA @ICMRDELHI @DBTIndia @doctorsoumya @BharatBiotech pic.twitter.com/AUhphvvivz
— suchitra ella (@SuchitraElla) May 15, 2021
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोवॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे.
Drugs Controller General of India (DCGI) approves Phase II/III clinical trial of COVAXIN in the age group of 2 to 18 years. Bharat Biotech to conduct trials in 525 healthy volunteers pic.twitter.com/ibxAW97bAc
— ANI (@ANI) May 13, 2021
भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी कोरोना लसीचं उत्पादन केलं जाईल, अशी माहिती देखील पॉल यांनी दिली. रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?
जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही; डॉ. शाहिद जमील यांचा दावा
Covaxin of Bharat Biotech effective on new strain of corona