Corona Vaccine : लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत तयार होणार, सीरम इन्स्टिट्यूटचा दावा

| Updated on: Jan 31, 2021 | 6:25 PM

EXIM ग्रुपचे संचालक पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकर लहान मुलांसाठी कोरोना लस तयार केली जाणार आहे.

Corona Vaccine : लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत तयार होणार, सीरम इन्स्टिट्यूटचा दावा
corona vaccination
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावातून लहान मुलांना वाचवण्यासाठी आता लवकरच कोरोनाची लस तयार होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं हा दावा केला आहे. EXIM ग्रुपचे संचालक पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकर लहान मुलांसाठी कोरोना लस तयार केली जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही लस 1 महिन्याच्या बाळालाही दिली जाऊ शकणार आहे.(Corona vaccine for small child is expected to be ready by October)

कोचीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नांबियार यांनी सांगितलं की ही लस आल्यानंतर मुलांना मोठा फायदा होणार आहे. ही लस पुढे चालून लहान मुलांसाठी कोरोनावरील औषध म्हणूनही काम करेल, असंही नांबियार म्हणाले. म्हणजे जर तुमच्या लहान मुलाला कोरोनाची बाधा झाली असेल तर ही लस तुम्हाला कोरोनापासून वाचवेल.

वर्षाच्या अखेरपर्यंत पहिली लस मिळण्याची शक्यता

पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नियोजनानुसार सर्वकाही ठीक पार पडलं तर ऑक्टोबरपर्यंत लस तयार होईल आणि वर्षाच्या अखेरपर्यंत ती मुलांना देण्यास सुरुवात होईल. नांबियार यांच्या म्हणण्यानुसार कोव्हिशील्ड ही लस मलेरियावर आधारित लस आहे. त्यामुळे ही लस कोरोनाच्या लक्षणांसाठीही फायदेशीर ठरेल. सरकारला गरज भासली तर एप्रिलपर्यंत लसीचे 20 कोटी डोस बनवू, असंही नांबियार म्हणाले. लस घेतल्यानंतर थोडा ताप आणि डोकेदुखी होणं ही सामान्य बाब असल्याचंही नांबियार यांनी सांगितलं. त्याशिवाय अन्य कुठल्याही साईड इफेक्ट्सच्या चर्चा नांबियार यांनी फेटाळल्या आहेत.

16 डिसेंबरपासून लसीकरण मोहीम सुरु

भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्ड ही लस बनवली आहे. तर भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन या लसीची निर्मिती केली आहे. भारतात आतापर्यंत लाखो कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने आपल्या शेजारी देशांनाही कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccination : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

Corona vaccine for small child is expected to be ready by October