Corona Active Cases | देशात कोरोनाने (Corona Patient) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांतील आकडे भयावह आहेत. दिल्लीतील परिस्थितीतर या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यासारखी झाली आहे. 24 तासांतील आकड्यांवरुन कोरोनाचे संक्रमण सुपर स्पीडने(Super Speed ) सुरु असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16561 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या(Active Patient) 1,23,535 आहे. कोरोनामुळे 24 तासात 49 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 5.44% वर पोहोचला आहे. दुसरीकडे, केंद्राने दररोज सरासरी 15000 हून अधिक प्रकरणे लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रम आयोजनाबाबत राज्यांना सल्ला दिला आहे. स्वातंत्र्यदिनी (Independence Day) मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालावी आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असा सल्ला केंद्राने राज्य सरकारांना दिला आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 2,779, महाराष्ट्रात 1877, पश्चिम बंगालमध्ये 598, उत्तर प्रदेशात 1018, केरळमध्ये 1212, कर्नाटकात 1691, ओडिशामध्ये 530, तामिळनाडूत 892, राजस्थानमध्ये 658, गुजरातमध्ये 552 रुग्ण आढळले आहेत.
देशात आतापर्यंत 5,26,928 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी दिल्लीत कोरोनाच्या 2,726 रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर राजधानीत पॉझिटिव्हिटी रेटही 14.38% वर पोहोचला आहे. याआधी 31 जानेवारी रोजी दिल्लीत 2,779 रुग्ण आढळले होते. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी रेट 6.20% होता. त्यानंतर दिल्लीत 38 जणांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत दिल्लीत 2,779, महाराष्ट्रात 1877, पश्चिम बंगालमध्ये 598, उत्तर प्रदेशात 1018, केरळमध्ये 1212, कर्नाटकात 1691, ओडिशामध्ये 530, तामिळनाडूत 892, राजस्थानमध्ये 658, गुजरातमध्ये 552 रुग्ण आढळले आहेत.
यापूर्वी देशात बुधवारी कोरोनाची रुग्णसंख्या 16,299 वर पोहचली. आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला. तर दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 4.58 टक्क्यांवर पोहचला आहे. आकड्यांवरुन हे स्पष्ट होत आहे की, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय रुग्ण संख्या घटली आहे. ती 3,185 ने कमी झाली आहे.
दिल्लीत ओमीक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उपप्रकारांचे रुग्ण आढळले आहेत. हे संक्रमण खूप वेगाने पसरवत आहेत. BA.5 हा ओमीक्रॉनच्या कोणत्याही प्रकारातून सर्वात संक्रमित संसर्ग आहे. अलीकडेच, एका संशोधनात असे दिसून आले आहे की BA.5 इतर व्हेरिएंटच्या तुलनेत सहजपणे पसरत आहेत. ते कोणालाही संक्रमित करू शकतात. तुम्ही लस घेतली असेल, बुस्टर डोस जरी घेतला असेल तर तुम्ही या व्हेरिएंटचे शिकार होऊ शकतात.
दिल्लीत मृत्यूही वाढले
दिल्लीत 1 ऑगस्टला 2, 2 ऑगस्टला 3, 3 ऑगस्टला 5, 4 ऑगस्टला 4, 5 ऑगस्टला 2, 6 ऑगस्टला 1, 7 ऑगस्टला दोन. 8 ऑगस्ट रोजी 6, 9 ऑगस्ट रोजी 7 आणि 10 ऑगस्ट रोजी 8 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 11 ऑगस्ट रोजी 6 जणांचा कोरोनामुळे जीव गेला.