Corona : कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, 27 टक्के रुग्णवाढ, 2 लाख 47 हजार रुग्णांची नोंद

| Updated on: Jan 13, 2022 | 10:17 AM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona : कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, 27 टक्के रुग्णवाढ, 2 लाख 47 हजार रुग्णांची नोंद
कोरोना
Follow us on

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 488 वर पोहोचली आहे. देशात 11 लाख 17 हजार 417 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 84 हजार 825 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 13.11 वर गेला आहे. महाराष्ट्रात काल 46 हजार 723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय.

24 तासात 52 हजार 697 कोरोना रुग्ण वाढले

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 84 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 47 हजार 15 हजार 361 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 2 लाख 47 हजार 417 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. 11 जानेवारी म्हणजेच मंगळवारची आकडेवारी बुधवारी उपलब्ध झाली होती. त्यामध्ये 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्ण आढळून आले होते. पुढील 24 तासात 52 हजार 697 कोरोना रुग्ण वाढले आहेत.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजारांच्या पार

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 488 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्रात काल 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. महाराष्ट्रात आतापर्यंत 1367 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.734 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे

18 लाख लोकांची कोरोना चाचणी

देशात सध्या 11 लाख 17 हजार 531 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 13.11 टक्के वर पोहोचला आहे. तर, आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.80 वर पोहोचला आहे. तर, आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार देशात काल 18 लाख 86 हजार 935 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

इतर बातम्या:

Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

पर्रिकरांच्या मुलाला तिकीट नाही देणार भाजपा? फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चा, ‘धाडसी’ निर्णय घेणार का उत्पल पर्रिकर?

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा

Corona virus india 247417 new cases reported in the last 24 hours omicron variant cases crosses five thousand