Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

| Updated on: May 05, 2021 | 7:52 PM

कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात Steroids चा वापर केला जात आहे. मात्र, कोरोनावरील उपचारासाठी Steroids चा वापरामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 3 लाख 82 हजार 315 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 3 हजार 780 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 38 हजार 439 कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं देशभरातील रुग्णालयांमध्ये बिकट स्थिती पाहायला मिळत आहे. रुग्णांची जीव वाचवण्यासाठी त्याचे नातेवाईक जीवाचं रान करत आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात Steroids चा वापर केला जात आहे. मात्र, कोरोनावरील उपचारासाठी Steroids चा वापरामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. (corona patient is Possibility of infection with pneumonia after being given steroids)

कमी लक्षणं असलेल्या रुग्णांना गंभीर व्हायरल न्युमोनियाचा धोका

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS चे संचालक डॉ. रणजीप गुलेरिया यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या Steroids च्या वापराबाबत गंभीर इशारा दिलाय. लक्षणं कमी असलेल्या रुग्णांना Steroids चा हाय डोस दिल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. अशावेळी रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते. Steroids चा हाय डोस दिलेल्या रुग्णाला गंभीर व्हायरल न्युमोनियाचा होऊ शकतो आणि त्यांच्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात व्हायरस पसरु शकतो, असं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलंय.

मॉडरेट रुग्णांना दिला जातो Steroids चा सल्ला

डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, Steroidsचा वापर फक्त मॉडरेड रुग्णांच्या उपचारांसाठीच केला जावा. Steroidsच्या वापराबाबत त्यांनी नागरिकांना महत्वाची सूचना देताना सांगितलं की साधारण लक्षणं असलेल्या रुग्णांना सुरुवातीच्या 5 दिवसांत Steroids दिले जाऊ नये. असं केल्यास कोरोना संक्रमित रुग्णासाठी त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये Steroidsचा वापर शरिरात असलेल्या व्हायरस अधिक प्रमाणात पसरण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करु नका’

कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तातडीने कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेता येऊ शकतात. पण तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर CT Scan करु नका असं आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून करण्यात आलं आहे. डॉ. गुलेरिया यांनी त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सीटी स्कॅन हे छातीच्या तीनशे एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे. तसेच कॅन्सरचा धोकाही संभवू शकतो, असा इशाराही गुलेरिया यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या ‘या’ माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर

Corona Positive Story | मार्च महिन्यात गावातील 107 जण बाधित, साकेगावच्या नागरिकांनी कोरोनाला कसं गाडलं ?

corona patient is Possibility of infection with pneumonia after being given steroids