Coronavirus: होम क्वारंटाईन असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल?

| Updated on: Apr 22, 2021 | 3:27 PM

ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. | Coronavirus oxygen proning technique

Coronavirus: होम क्वारंटाईन असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल?
डॉक्टरांनीही Proning फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
Follow us on

मुंबई: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा (Oxygen Shortage) जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य मंत्रालयाने काही नव्या सूचना जारी केल्या आहेत. (What to do if oxygen level fall in body here is the proning technique)

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली तर Proning केल्यास (पोटावर झोपून) फायदा होऊ शकतो. डॉक्टरांनीही Proning फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास Proning करुन ही प्राणवायूची पातळी पुन्हा पूर्ववत होऊ शकते. तुम्हाला श्वसनाचा विकार असेल किंवा शरीरातील ऑक्सिजनचा स्तर 94 च्या खाली गेला तर अशा स्थितीत Proning फायदेशीर ठरू शकते. कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत Proning करुन रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

Proning नेमकं कसं कराल?

Proning करण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवा. त्यानंत रुग्णाच्या मानेखाली एक उशी द्या. तसेच त्याच्या पोटाखाली आणि पायाच्या खाली दोन उशा ठेवा. अशा स्थितीत रुग्णाला सतत श्वास घ्यायला सांगा. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास मदत होईल. मात्र, 30 मिनिटांपेक्षा Proning करु नये, अशी सूचनाही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच जेवल्यानंतर लगेच Proning करू नये. तर गर्भवती महिलांनी Proning अजिबात करु नये.


संबंधित बातम्या:

रेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील 3 मोठ्या डॉक्टरांकडून कोरोनावर मात करण्याचा ‘हा’ उपाय

Covid 19: कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल; AIIMS प्रमुखांचे भाकीत

कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता मास्क वापराल, WHO ने जारी केलेल्या ‘या’ सूचना नक्की वाचा

(What to do if oxygen level fall in body here is the proning technique)