काऊंट डाऊन सुरु, उद्या दुपारी 2.35 वा. चंद्रयान-3 चे लॉंचिग, भारत बनणार जगातील चौथा देश

| Updated on: Jul 16, 2023 | 12:40 AM

20 जुलै रोजी 1969 रोजी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. 1969 ते 1972 या काळात अमेरिकेचे बारा जण चंद्रावर पाऊल ठेवून आले. साल 1972 नंतर गेल्या 51 वर्षांत चंद्रावर कोणताही मानव गेलेला नाही.

काऊंट डाऊन सुरु, उद्या दुपारी 2.35 वा. चंद्रयान-3 चे लॉंचिग, भारत बनणार जगातील चौथा देश
chandrayaan - 3 rover
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेचे काऊंट डाऊन सुरु झाले आहे. उद्या श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता महाशक्तीशाली रॉकेट प्रक्षेपकाद्वारे चंद्रयान – 3 चे उड्डाण होणार आहे. एमव्ही – 3 चा सक्सेस रेट हा 100 टक्के आहे. दरम्यान, या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले असून या मोहिमेपूर्वी शास्रज्ञाच्या टीमने तिरुपती वेंकटचलापती मंदिरात दर्शन घेत आशीवार्द मागितले. यावेळी चंद्रयान-3 चे एक मिनिएचर मॉडेल देखील त्यांच्या सोबत होते.

चंद्रयान – 3 मोहिमेत उद्या जरी रॉकेट लॉंचिंग होऊन अंतराळात चंद्रयान झेपावणार असले तरी प्रत्यक्षात 24 – 25 ऑगस्ट रोजी चंद्रावर स्वारी करता येणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. रोव्हर चंद्रावर 14 दिवस चारी दिशेला 360 डीग्री फिरणार असून चंद्राच्या पृष्टभागाचे निरीक्षण करणार आहे. चंद्रयान -2 मोहिमेत चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लॅंडींग करता न आल्याने आपला लॅंडर विक्रम क्षतिग्रस्त झाला होता. तरीही ऑर्बिटर शाबूत असून अजूनही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता या ताज्या चंद्रयान-3 मोहिमेत भारताने ऑर्बिटर सोबत नेलेला नाही. परंतू प्रोपल्शन मॉड्यूल असणार आहे. जो लॅंडर आणि रोव्हर पासून वेगळा झाल्यावर चंद्राभोवती फिरणार आहे. आणि चंद्राभोवतीचे जीवन निरीक्षण करणार आहे. रोव्हर आता अधिक कार्यक्षम असणार असून तो आपल्या टायरची चंद्रावर उमटलेल्या प्रतिमा देखील पाठविणार आहे.

चंद्रावर स्वारी करणारा चौथा देश बनणार

भारताने चंद्रयान-1 मोहिमेच चंद्रावर पाण्याचे साठे असल्याचे जगाला सर्वप्रथम सांगितले होते. चंद्रयान-2 मोहिमेत थोडक्यात लॅंडर विक्रमचे सॉफ्ट लॅंडींग न झाल्याने आपले यश झाकोळले गेले. परंतू आता आपण लॅंडर अधिक शक्तीशाली केलेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश बनणार आहे. याच भागात चंद्रयान-1 दरम्यान मून इम्पॅक्ट प्रोब सोडण्यात आला होता. त्यामुळे चंद्रावर पाणी असल्याचा शोध लागला होता. येथेच चंद्रयान-2 ची क्रॅश लॅंडींग झाली होती. आता चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग अमेरिका, रशिया, चीन या तीनच देशांनी केली आहे. यात यश आले तर भारत चौथा देश बनणार आहे.

तिरुपतीच्या दर्शनाला इस्रोची टीम पाहा-

चंद्रयान-2 च्या चुका टाळल्या

साल 2019 मध्ये चांद्रयान – 2 ला अपयश आल्याने त्यातील चुका टाळून चार वर्षांनंतर इस्रोने लॅंडरला अधिक कार्यक्षम केले आहे. लॅंडरच्या चारी कोपऱ्यावर चार इंजिन थ्रस्टर लावलेले असतील, गेल्यावेळेचे मध्ये असलेले पाचवे इंजिन हटवले आहे. लॅंडींग केवळ दोन इंजिनांनी होणार आहे. इतर दोन इंजिन आपात्कालिन स्थितीत वापरले जातील असे सूत्रांनी सांगितले.