नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून देण्यास नकार दिलाय. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला रोहिणी न्यायालयात हजर करत चौकशीसाठी आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी न देता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. यावेळी सरकारी वकिलांनी सुशील कुमार चौकशीत सहकार्य करत नसल्याचं सांगत या प्रकरणी तपासासाठी त्याच्या आणखी 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती (Court reject police custody of Wrestler Sushil Kumar in Murder case Babita Phogat reaction).
A Delhi court remands wrestler Sushil Kumar to judicial custody, refuses Delhi Police plea seeking extension of custody pic.twitter.com/6BReuChgkO
— ANI (@ANI) June 2, 2021
पोलिसांनी न्यायालयात सुशील कुमार या प्रकरणी पूर्ण माहिती सांगत नसल्याचं सांगितलं. माझ्याकडून हे कसं झालं माहिती नाही. आता सर्व उद्ध्वस्त झालं असं म्हणत तो पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं टाळत असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. तसेच सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडित सागर राणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ हा त्याच्याविरोधातील मुख्य पुरावा असल्याचंही वकिलांनी सांगितलं. या व्हिडीओचा उद्देश इतरांना दाखवून मी काहीही करु शकतो असं सांगत दहशत निर्माण करण्याचा होता. तो व्हिडीओ सर्वांना पाठवण्यासाठी रेकॉर्ड केल्याचंही त्यांनी न्यायालयासमोर नमूद केलं.
दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं, “घटना झाली तेव्हा सुशील कुमारने जे कपडे घातलेले होते ते अद्याप मिळाले नाहीत. त्याचा मोबाईल देखील मिळालेला नाही. या सर्व गोष्टींचा शोध लावण्यासाठी सुशील कुमारच्या पोलीस कोठडीची गरज आहे. आरोपी सुशीलला या वस्तूंचा शोध घेण्यासाठी भटिंडा आणि हरिद्वारला घेऊन जावं लागेल. तेथे महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. सुशीलच्या मते हे सर्व साहित्य तेथे असू शकते.”
एकेकाळची कुस्तीपटू आणि सध्याची भाजप नेता बबिता फोगाटने पहिल्यांदाच सुशील कुमारवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बबिता फोगाट म्हणाल्या, “सुशील कुमार एक चांगले खेळाडू होते. त्यांनी शिस्तबद्धपणे खेळत देशासाठी पदक आणले आहेत. सागर हत्येप्रकरणी सुशील कुमारवर न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल.”
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Court reject police custody of Wrestler Sushil Kumar in Murder case Babita Phogat reaction