नवी दिल्ली : कोविड प्रकोपामुळे (COVID CRISIS) सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे देशांतर्गत सेवांसोबत आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा वेग मंदावला होता. दरम्यान, कोविड प्रकोप निवळल्यानंतर देशांतर्गत विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. येत्या एक वर्षात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या एक कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सी (RATING AGENCY) इक्राने याबद्दलचा अहवाल प्रकाशित केला आहे. एप्रिल 2019 मध्ये भारतीय एअरलाईन्सच्या माध्यमातून एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. देशांतर्गत विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची (INTERNATIOANL PASSANGER) संख्या 1.85 कोटींवर पोहोचली आहे. रशिया-युक्रेन विवाद तसेच विमान इंधनाचे वाढते दर यामुळे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचं निरीक्षण इक्रानं नोंदविलं आहे. इक्राचे उपाध्यक्ष सुप्रियो बॅनर्जी यांनी एप्रिल 2022 मध्ये सरासरी 2726 उड्डाणांचं दैनंदिन प्रमाण होतं. गेल्या वर्षी हा आकडा 2000 होता. मार्च 2022 मध्ये उड्डाणांचा आकडा 2588 पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे.
चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत विमान उड्डाणं सर्वसामान्य स्थितीत येण्याची शक्यता आहे. विमान इंधन एटीएफचे वाढलेले दराचे मोठे आव्हान विमान वाहतूक क्षेत्रासमोर आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. मात्र, काही राज्यांत नियमांच्या बाबतीत अपवाद आहे. कोविडचा प्रादूर्भाव वाढल्यास पुन्हा बंधने येऊ शकतात. विमान प्रवासासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे सर्वाधिकार राज्यांचे असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
विमान इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात एटीएफच्या दरांत दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नव्या दरानुसार जेट इंधनाचे दर 1,12,925 किलोलीटरवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात एटीएफमध्ये तब्बल सातवेळा वाढ करण्यात आली आहे. एटीएफ दरवाढीचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या तिकिटावर दिसून येत आहे. कोविड काळात विमानसेवा ठप्प असल्याने विमान कंपन्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते
>> देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत 83% वाढ
>> विमान इंधनदरवाढीचा तिकिटावर परिणाम
>> रशिया-युक्रेन युद्धामुळं आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येवर परिणाम
>> देशांतर्गत प्रवासासाठी अपवाद वगळता नियम नाही.