Covid Variant BF7: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकेदुखी वाढविली, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक, दिवाळीच्या तोंडावर निर्बंध लागणार?

| Updated on: Oct 18, 2022 | 8:20 PM

नुकताच कोरोनाच्या विळख्यातून देश हळूहळू सावरत असताना आता एक नवीन धोकादायक व्हेरिएंट भारतात आढळल्याचे समोर आले आहे.

Covid Variant BF7: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकेदुखी वाढविली, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक, दिवाळीच्या तोंडावर निर्बंध लागणार?
Covid BF 7
Follow us on

नवी दिल्ली, देशात कोरोना विषाणूचे (Covid Variant BF7)  नवीन उप-प्रकार BF.7 आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. देशात ओमिक्रॉनच्या या उप-प्रकारचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया  यांनी एक उच्चस्तरीय बैठक (Health Ministry Meeting) घेतली, ज्यामध्ये Insacog, DBT आणि NTAGI चे आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. आरोग्य मंत्रालयाने सर्वांनी कोविडच्या या नवीन उप-प्रकाराबद्दल विशेष खबरदारी आणि दक्षता घेण्याचा सल्ला दिला आहे, हा व्हेरिएंट ढिकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: दिवाळीसह सणांमध्ये गर्दी वाढल्याने त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे.

आरोग्य विभागाची चिंता का वाढली?

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 17.7% वाढ झाली आहे. तपासणी केल्यावर, राज्याच्या आरोग्य विभागाला ओमिक्रॉनचे BF.7 आणि XBB जबाबदार असल्याचे आढळले. तज्ज्ञांच्या मते, कोविडचा हा नवीन प्रकार वेगाने पसरणारा आहे. तसेच, वृद्ध आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी ते खूप घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत थंडीचे वातावरण आणि सणासुदीचा काळ पाहता देशात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढण्याची भीती आहे. या भीतीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली.

बचाव कसा करायचा?

आरोग्य विभागाने लोकांना फ्लूसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर कोविडच्या योग्य नियमावलीचे पालन करण्यास सांगितले आहे, जसे की मास्क घालणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, आपापसात अंतर ठेवणे इ. BF.7 उप-प्रकारच्या लक्षणांमध्ये सतत खोकला, श्रवण कमी होणे, छातीत दुखणे  यांचा समावेश आहे. हे वास ओळखण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम करू शकते. आरोग्य विभागानेही सर्वांना लसीचा बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिला आहे.

हे सुद्धा वाचा