नवी दिल्ली : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये गाय तस्करां (Cow Smugglers)नी फिल्मी स्टाईलने दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुग्राम पोलिसांनी गाय तस्करांचा 22 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि एकूण 6 तस्करांना पकडण्यात यश मिळवले. बल्लू, तस्लीम, पापा, शहीद आणि खालिद अशी अटक केलेल्या गोतस्करांची नावे आहेत. हे सर्व आरोपी हरियाणातील मेवात आणि नूंहचे रहिवासी आहेत. गायींना गाडीतून फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. हरियाणातील आधुनिक काळातील नूह जिल्हा आणि राजस्थान आणि यूपीच्या लगतच्या भागांचा समावेश असलेला मेवातचा ऐतिहासिक प्रदेश हा बेकायदेशीर गोमांस माफियांचे एक केंद्र आहे, ज्यांचे संपूर्ण भारतात जाळे आहे. मेवाती गो तस्कर हे देशातील सर्वात दुष्ट आणि कठोर गुन्हेगार आहेत. (Cow smugglers throw cows from a moving vehicle in a filmy style)
व्हिडिओमध्ये गोतस्कर गायींना खाली फेकून देताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांची गाडीही उलटल्याचे दिसत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोन गोतस्करांनी उड्डाणपुलावरून उडी मारल्या. यात त्या दोघांचे पाय मोडले आणि ट्रकही मोडल्याचं दिसत आहे. ट्रकचे टायर फुटल्यानंतरही आरोपी गाडी पळवत आहेत. ही घटना काल रात्रीची आहे. सेक्टर 29 मधून सुमारे 6-7 गायी चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. आरोपी रस्त्यात गायींना फेकत चालले होते, कारण मागून पीसीआर व्हॅन येत होते, अशी माहिती डीसीपी क्राईम गुरुग्राम राजीव देसवाल यांनी सांगितले. (Cow smugglers throw cows from a moving vehicle in a filmy style)
गुरुग्राम पुलिस ने 22 KM पीछा करके फिल्मी स्टाइल में गोतस्कर पकड़े। नाम हैं बल्लू, तस्लीम, पापा, शहीद और खालिद। पुलिस की गाड़ियां पलट देना चाहते थे, इसलिए चलते वाहन से गाय नीचे फेंकते रहे। #Gurugram #Haryana pic.twitter.com/TwY1OHGL9E
— Sachin Gupta | सचिन गुप्ता (@sachingupta787) April 9, 2022
इतर बातम्या
Virar Crime : विरारमध्ये लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप
CCTV Video: ना चावीची गरज, ना हातोड्याचा घाव! ओढणीनं शटर फोडून पाचही चोरट्यांची एकसाथ धाव