MEIL फाऊंडेशन आणि तेलंगणाच्या सहकार्याने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची ( YISU ) स्थापना

| Updated on: Oct 26, 2024 | 8:04 PM

MEIL फाऊंडेशन आणि तेलंगणा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून तरुणांच्या कौशल्य विकासासाठी यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली आहे.

MEIL फाऊंडेशन आणि तेलंगणाच्या सहकार्याने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची ( YISU ) स्थापना
Creation of Young India Skill University in collaboration with MEIL Foundation and Telangana Government
Follow us on

सध्याच्या काळात नोकरीसाठी पारंपारिक पुस्तिकी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाचे देखील महत्व मोठे आहे. यासाठी तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड  ( MEIL) ची सामाजिक दायित्व शाखा असलेल्या MEIL फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी MEIL फाऊंडेशन सुमारे 200 कोटीची मदत करणार आहे.

कौशल्य विकासाला हल्लीच्या काळात महत्व आले आहे. यासाठी तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली आहे. तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्याचे काम ही यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी करणार आहे. हैदराबाद येथे यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी एमईआयएल (MEIL) फाऊंडेशनने 200 कोटीचा निधी दिला आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्यापीठ तरुणांसाठी कौशल्य आणि उद्योजकता वाढावी यासाठी प्रगत प्रशिक्षणाचे काम करणार आहे.

सामंजस्य करारावर सह्या

या संदर्भातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि MEIL चे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा रेड्डी उपस्थित होते. हैदराबादच्या जवळील मीर खान पेटा येथे 57 एकरच्या विस्तीर्ण जागेवर .या विद्यापीठाची उभारणी होत आहे. YISU कॅम्पसमधील प्रमुख सुविधांमध्ये शैक्षणिक, प्रशासकीय इमारती, वाचनालय आणि संगणक कार्यशाळा, प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि प्राध्यापक निवास,गेस्ट हाउस आणि VC, रजिस्ट्रार निवास, 700 आसनी सभागृह आणि कॉन्फरन्स रूम इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.