कोलकाता: यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.
यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने ओडिशा राज्यासाठी 641 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिफारशीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मदतीची घोषणा केली.
ओडिशा : यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बालासोर आणि भद्रकी हे दोन जिल्हे जास्त प्रभावित झाले आहेत. बालासोर तसेच क्योंझर येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या चक्रीवादळामुळे राज्यात किती नुकसान झाले हे गुरुवारी सकाळपर्यंत समजेल. तशी माहिती ओडिशाचे स्पेशल रिलीफ कमिश्नर यांनी दिली आहे.
ओडिशा : यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यावषयी माहिती घेण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या 128 गावांना आगामी सात दिवसांसाठी मदत मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे सामान या ग्रामस्थांना दिले जाईल.
यास चक्रीवादळामुळे भुवनेश्वर येथील बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरु करण्यात आले आहे. संध्याकाळी सात वाजता हे विमानतळ सुरु करण्यात आले. यास चक्रीवादळामुळे या विमानतळाला 27 मे रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत होते. तसेच ओडिशामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत होता. मात्र आता यास चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने तशी माहिती दिली आहे. पुढील तीन ते चार तासांत यास चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
इंडियन कोस्टगार्ड विभागानं यास चक्रीवादळात पश्चिम बंगालच्या नयाचार भागात अडकलेल्या 100 व्यक्तींना वाचवलं आहे. इंडियन कोस्टगार्ड विभागाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. दुसरीकडे यास चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याची माहिती आहे.
#CycloneYaas Aid to civil authorities @IndiaCoastGuard Air Cushion Vehicle rescued about 100 stranded people at Nayachara, WB. Rescue operation in progress #ICG Disaster Response Team assisted in evacuation of locals at Contai, WB #HarKaamDeshKeNaam @DefenceMinIndia pic.twitter.com/oWT8wCnGsR
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 26, 2021
भारतीय सेनादलाकडून पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर मध्ये मदतकार्य सुरु आहे. वैद्यकीय आणि इतर मदत पोहोचवण्याचं भारतीय सेनादल करत आहे. स्थानिक लोकांना यास चक्रीवादळात मदत करण्याचं काम सुरु आहे.
#CycloneYaas#IndianArmy conducts Rescue and Relief Operations in East Midnapore. #Logistics & #MedicalAid being extended to the locals.#IndianArmy#NationFirst pic.twitter.com/WwUxIBQuxK
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 26, 2021
ओडिशामधील विशेष मदत पथकाचे आयुक्त प्रदीपकुमार यांनी यास चक्रीवादळाचं लँडफॉल पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. ओडिशातील बालासोर भागात वाऱ्याचा वेग कमी होत आहे. निलगीरी आणि मयूरभंजमध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे राज्यातील तीन लाख घरांचं नुकसान झाल्याची माहिती दिली. याशिवाय 15 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं देखली त्यांनी सांगितलं आहे.
ओडिशामध्ये किनाऱ्यावरील बोटी, दुकानं, पोलिसांची बॅरिकेटसयांच उदयपूरजवळ नुकसान झालं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बार्डरवरील पोलिसांचे बॅरिकेटस उडून गेली आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
ओडिशात यास चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुले धामरा जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे. NDRF च्या टीम्स बचावकार्य करत आहेत. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचं काम सुरु करण्यात आलेलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1कोटी जनता प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत पीटीआयनं ट्विट केलं आहे.
यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागनं वर्तवला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
#WATCH | Jharkhand: Ranchi experiences a change in weather in wake of #CycloneYaas.
As per IMD, the state will receive heavy to very heavy rainfall today & tomorrow with extremely heavy rainfall in isolated places. pic.twitter.com/Cm9g4v4wdg
— ANI (@ANI) May 26, 2021
यास चक्रीवादळामुळे ओडिशातील पराद्वीप येथील मासेमारीच्या बोटींचं नुकसान झालं आहे.
Odisha: Fishing boats at Paradeep jetty damaged due to #CycloneYaas pic.twitter.com/043MQfsBBE
— ANI (@ANI) May 26, 2021
यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोरच्या 20 किमी दक्षिणेला सकाळी 10.30 वाजता पोहोचले होते. साडे अकरा वाजता वाऱ्याचा वेग 130 ते 140 किमी ताशी असा होता.यास चक्रीवादळ ओडिशातील उत्तर पूर्व भागाकडे वळलं असल्याचं हवामान विभागनं सांगितलं आहे.
यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. ठिकठिकाणी वाऱ्याच्या वेगानं पडझड झालेली आहे. झारखडंमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे सिक्कीम, आसाम, मेघालय आणि बिहारमध्ये पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम बंगालच्या दिघी भागात समुद्राचं पाणी घुसलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोलकाताला जाणारी विमान रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत सहा उड्डाणं रद्द केल्याची माहिती आहे.
यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पोहोचलं आहे. वादळामुळं मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवाई दलानं एनडीआरएफच्या मदतीनं 100 हून अधिक प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचलवं आहे. ऑपरेशन को C-130 आणि दोन An-32 विमानांनी प्रावशांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं.