मुंबई : मंगळवारी (22 नोव्हेंबर) लेह येथील इंडो-तिबेटीयन सीमा पोलीसदलाच्या (आयटीबीपी) वतीने ‘फिट इंडिया कॅम्पेन’ अंतर्गत सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 11,500 फूट उंचीवर ही सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. लोकसभेचे खासदार ज्यामयांग टी नामग्याल यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखविला. ज्या भागात तपमान -20 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणीच्या जवानांना तंदुरुस्त ठेवणे, हे या सायक्लोथॉनचे मुख्य उद्दिष्ट आहे (Cyclothon organised under fit india campaign at Indo Tibetan border).
याआधी, फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सायक्लोथॉनचे दुसरे सत्र सामाजिक क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी 7 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच केले होतते. हा मेगा सायकलिंग कार्यक्रम 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
आज लेह में 11,500 फीट पर #FitIndia कैंपेन के तहत आईटीबीपी द्वारा आयोजित #Cyclothon का हरी झंडी दिखाकर रवाना किया !#Himveers #fitindiacyclothon @KirenRijiju @IndiaSports @narendramodi @PMOIndia @AmitShah @HMOIndia @PTI_News @lg_ladakh @ANI https://t.co/P2Q0xP2mNd
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) December 22, 2020
फिट इंडिया मोहिमेअंतर्गत हा सायकलिंग कार्यक्रम देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी फिट इंडिया वेबसाईटवर नाव नोंदवून आपण आपल्याला पाहिजे तेथे दररोज सायकलिंग करून यात सहभागी होऊ शकता. @FitIndiaOff, #FitIndiaCyclothon आणि #NewIndiaFitIndia हे हॅशटॅगचा वापर करून आपल्या सायकलिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू शकता (Cyclothon organised under fit india campaign at Indo Tibetan border).
नागरिकांना फिट इंडिया मोहिमेच्या या मेगा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देताना किरेन रिजीजू यांनी ट्विट केले की, ‘फिट राहण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी सायकल चालवणे हा एक चांगला मार्ग आहे. मी, 7 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या फिट इंडिया सायक्लोथॉनसाठी माझ्या कुटुंबियांसह, मित्रांसह तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.’
‘फिट इंडिया’ मोहिमे अंतर्गत या सायक्लोथॉनचे उद्घाटन कार्यक्रम क्रीडामंत्र्यांच्या हस्ते जानेवारी 2020मध्ये गोव्यातील पणजी येथे पार पडला होता. जास्तीत जास्त लोकांना सायकल चालवावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशभरात 35 लाखांहून अधिक सायकलस्वारांचा सहभाग नोंदवला गेला आहे.
(Cyclothon organised under fit india campaign at Indo Tibetan border)
हेही वाचा :
Indoor Workout Tips | बाहेर कोरोनाचा धोका? घरच्या घरी ‘या’ व्यायाम प्रकारांनी ठेवा स्वतःला फिट!https://t.co/57BaJh8tID#workout #Indoorworkout #Health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020