cyrus mistry car accident : आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनचा सायरस मिस्त्री कार अपघातावर रिपोर्ट धक्कादायक

| Updated on: Sep 27, 2022 | 6:43 PM

सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्यानंतर थेट इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडूनच अपघातस्थळाचा अहवाल तयार केला गेला आहे. मात्र तो अहवालतूनच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

cyrus mistry car accident : आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनचा सायरस मिस्त्री कार अपघातावर रिपोर्ट धक्कादायक
Follow us on

मुंबईः गेल्या काही दिवसापूर्वी टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातसंदर्भात (Car Accident) अनेक सवाल उपस्थित केले गेले. आता पुन्हा सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे काही गोष्टी उघड झाल्या आहेत. इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडून (IRF) अपघातस्थळावरील तपासणी अहवाल आता उघड करण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये सायरस मिस्त्री यांच्या अपघातस्थळी आढळलेल्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडून तयार केला गेलेला अहवाल आता रस्ते वाहतूक मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवून त्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या शिफारशी केल्या गेल्या आहेत.

सायरस मिस्त्री यांचा अपघात झाल्यानंतर वाहतूक, वाहने आणि वाहतूक नियमांची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या रस्ता अपघातामुळे केल्या गेलेल्या ऑडिटमधील माहिती आता समोर आली आहे.

स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडून हा अहवाल तयार केला गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 चा अहवाल सादर करताना त्यामध्ये देखभालीचा अभाव असल्याचे म्हटले आहे.

इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडून केलेल्या अहवालात रस्ता सुरक्षेशी संबंधित इतर त्रुटींचाही उल्लेख करण्यात आला आहे.

सायरस मिस्त्री यांचा पालघरला अपघात झाल्यानंतर आठवडाभरानंतर इंटरनॅशनल रोड फेडरेशनकडून अपघातस्थळाचे ऑडिट करण्यास सुरुवात केली गेली. हा अहवाल तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगीही घेण्यात आली होती.

जिनिव्हामधील ग्लोबल सेफ्टी बॉडी या संस्थेकडून हा अहवाल तयार केला गेला आहे. या अहवालामध्ये राष्ट्रीय महामार्ग-48 च्या 70 किमी पर्यंत कोणत्याही प्रकारची देखभाल नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच वाहनचालकांसाठी लागणारे सुचनांचे फलकांचा कमतरताही येथे दिसून आली. तसेच वाहतूक करताना लागणाऱ्या खाणा खुणा आणि चिन्हंही रस्त्यावरुन गायब झाली आहेत.

इंटरनॅशनल रोड फेडरेशनचे अध्यक्ष के कपिला यांनी सांगितले की, देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर दुर्घटनेच्या काही आठवड्यांनंतर या मार्गाची तपासणी केली गेली. त्यामध्ये असलेले आभाव, कमतरता यांची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला दिली गेली आहे.

सायरस मिस्त्रींचा ज्या परिसरात अपघात झाला त्या भागात अनेक लहान-मोठी बांधकामं झाली आहेत. त्याचाही उल्लेख या अहवालात केला आहे.

येथे उड्डाणपूल, वाहनांसाठी लागणारा अंतर्गत रस्ता, पादचाऱ्यांसाठी लागणारा अंतर्गत मार्ग, लागणारे लहान मोठे पुलही या मार्गावर आहेत.

राष्ट्रीय महामार्ग 48 हा 70 किमीचा परिसर असून या मार्गावरुन 6-लेन जातात. सूर्या नदीच्या पुलाजवळ असलेल्या भागातच सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याचेही म्हटले आहे.