नवी दिल्ली: भाजपमध्ये दलित नेत्यांना काडीची किंमत नाही. अगदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांकडून अशीच वागणूक दिली जाते, असा आरोप काँग्रेसचे नेते उदित राज (Udit Raj) यांनी केला. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान हा प्रकार घडला. या चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला, ‘माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती’ असे बोलून गेले. (Congress leader Udit Raj slams BJP)
यावर उदित राज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा उदित राज यांनी भाजपवर आगपाखड करायला सुरुवात केली. तेव्हा भाजपच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर उदित राज आणखीनच चवताळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांचं अभिवादनही स्वीकारत नाहीत, असे उदित राज यांनी म्हटले.
उदित राज यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्लाही चांगलेच संतापले. काँग्रेसमध्येच दलितांना कोणतीही किंमत नाही. भाजपने तुम्हाला खासदार केले, पण काँग्रेसने तुम्हाला काय दिले? तुमची काँग्रेसमध्ये काय पत आहे?, असा सवाल प्रेम शुक्ला यांनी उदित राज यांना विचारला.
या सगळ्या हमरीतुमरीमध्ये उदित राज यांनी भाजपच्या प्रेम शुक्ला यांचे आभार मानले. तुम्ही आज खरी गोष्ट जगासमोर आणलीत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लोकांना कळाली. तसेच खासदारकीच्या उमेदवारीसाठी भाजप माझ्या दारावर आली होती. नंतरच्या काळात भाजपने माझी व्होटबँक फोडली, असा पलटवारही उदित राज यांनी केला.
इतर बातम्या:
मोदी सरकारने जबरदस्तीने घरी बसवले; IPS अधिकाऱ्याने घराबाहेर लावला बोर्ड, म्हणाला…
आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं ‘हे’ कारण!
(Congress leader Udit Raj slams BJP)