दिल्ली: देशातील लोकशाहीला घातक आणि घटनेविरोधात पावले उचलली जात असल्याने एकनाथ शिंदे गटाच्या (Rebel MLA Eknath Shinde)पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना शिंदे गटावर केली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाला (Shivsena Party) संपवण्याचे काम सुरू असल्याने त्यामुळे आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयावरच भरवसा असल्याचेही खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला कोणीही बदनाम करु नका असा सल्ला वजा उपदेशही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
यावेळी दिल्लीतील बैठकीविषयी सांगताना सांगितले की, शिवसेनेचा शिवसैनिक आणि पक्ष म्हणून आम्ही बैठकीला आलो असल्याचे सांगत त्यांनी पक्षप्रमुखांनी जो आदेश दिले आहे त्याचे आम्ही पालन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतातील कायद्यानुसार सांगितले गेले आहे की, दोन तृतियांश मतं असली तरी त्याला गट स्थापन करता येत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते त्यामुळे शिंदे घटना उचलली पाऊल ही चुकीचे असल्याचे सांगत ते जे काही करत आहेत ते घटनाविरोधी कार्य करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधत त्यांनी भाजपकडून कायद्याची कशी पायमल्ली केली जात आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी भाजपकडून स्वतःसाठी न्यायापालिकेचा वापर करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले की, हे सर्व घडत आहे ते चुकीचे असून लोकशाहीत घातक असलेल्या घातक गोष्टीच केल्या जात आहेत, त्यामुळे शिंदे गटाकडून जे काही घडत आहे ते चुकीचे असून घटना डावलून सगळं केलं जात असल्याची टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे. त्यामुळे शेवटचा आशेचा किरण म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाकडून घटनाबाह्य गोष्टी केल्या जात असल्याने त्यांच्याकडून लोकशाहीसाठी घातक पावले उचलली जात असल्याचे सांगून त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लबोल केला. त्यामुळे त्यांनी बोलताना कायद्याचा आधार देत कायदा काय सांगतो म्हणत त्यांनी सांगितले की, दोन तृतियांश मतं असली तरी त्याला गट स्थापन करता येत नाही, मात्र
त्याला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते असल्याचेही त्यांनी स्पष्ट करवी.