जगभर दरिपल्ली रामय्या यांची ओळख ट्री मॅन ऑफ इंडिया अशी आहे. रामय्या यांनी पृथ्वीवर एक कोटीपेक्षा जास्त झाडं लावलीत. झाडं लावण्याचं काम अजूनही सुरू आहे. घरून निघतात तेव्हा बी आणि रोप सोबत असतात. हे सर्व पाहून लोकांनी त्यांना पागल म्हटलं. २०१७ मध्ये रामय्या यांना या कामासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हापासून लोकं त्यांची स्तुती करतात.
झाडं लावण्यासाठी रामय्या यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी रामय्या यांनी आपल्या मालकीची तीन एकर जागा विकली. पण, हे अभियान सुरू ठेवले. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. अशावेळी रामय्या यांना सलाम ठोकावाचं लागेल.
रामय्या हे तेलंगणातील खमन्ना जिल्ह्यातील रेडीपल्लीचे रहिवासी. २०१७ साली त्यांच्या कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री अवार्ड दिला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. रामय्या यांच्या जीवनाची स्टोरी तेलंगणातील सहाव्या वर्गातील अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
झाडं लावा झाडं जगावा, असा नारा राज्य सरकार देत असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, झाडं लावण्याचे आकडे समोर येतात. प्रत्यक्ष झाडं दिसतचं नाही. झाडं जगवली जात नाहीत. परंतु, रामय्या यांनी त्यांचं अख्ख जीवन झाडं लावण्यासाठी घालवली. झाडांचं संगोपन केलं. त्यामुळे त्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. अजूनही त्यांच काम सुरू आहे.
लहानपणापासून रामय्या हे बीयाणे गोळा करून झाडं लावत असतं. त्यांच्या आईपासून त्यांनी हा वसा घेतला. झाडं लावा जीवन वाचवा, असा नारा ते देतात. घराबाहेर पडताना त्यांच्या शिखात नेहमी बीयाणे असतात. पडीक जमीन दिसल्यास ते त्याठिकाणी झाडं लावतात.