पुणे : ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोवॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे. (DCGI approves phase 2 and 3 clinical trials of Covaxin for 2 to 18 years old)
भारत बायोटेकला चाचणीची परवानगी
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी तज्ज्ञ समितीची (एसईसी) शिफारस मान्य केली आहे. 2 ते 18 वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या कोव्हिडवरील लसीच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. लस निर्माता कंपनी भारत बायोटेक लिमिटेडला 12 मे रोजी ही परवानगी मिळाली. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.
किती दिवसांच्या अंतराने चाचणी
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटावर कोव्हॅक्सिनची फेज 2-3 क्लिनिकल चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल. 28 दिवसांच्या अंतराने स्नायूंवाटे (इंट्रामस्क्युलर) ही लस दिली जाईल.
Drugs Controller General of India (DCGI) approves Phase II/III clinical trial of COVAXIN in the age group of 2 to 18 years. Bharat Biotech to conduct trials in 525 healthy volunteers pic.twitter.com/ibxAW97bAc
— ANI (@ANI) May 13, 2021
तिसऱ्या लाटेची शक्यता
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर लहान मुलांचं काय होणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या मुलांवर कशाप्रकारे उपचार होणार? आदी बाबींवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे, असं कोर्टाने केंद्राला म्हटलं होतं. तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्यानंतर अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी स्पेशल रुग्णालय आणि कोविड सेंटर्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
संबंधित बातम्या :
जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही; डॉ. शाहिद जमील यांचा दावा
भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी
(DCGI approves phase 2 and 3 clinical trials of Covaxin for 2 to 18 years old)