नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विविध ठिकाणी पोस्टर्स (Posters) लावल्याने पोलिसांनी केलेली कारवाई सध्या चर्चेत आहे. हे राजकीय नाट्य सुरु आहे राजधानी दिल्लीत (News Delhi). पोलिसांनी मोदींविरोधात पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात 100 एफआयआर दाखल केले आहेत.तर 6 जणांना या प्रकरणी अटक झाली आहे. रात्रीच्या अंधारात दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले. सत्ताधारी आम आदमी पार्टीशी याचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या ऑफिसमधून निघालेली एक व्हॅनदेखील जप्त केली आहे. त्यात जवळपास 10 हजार पोस्टर्स होते. हे पोस्टर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट तसेच सार्वजनिक संपत्तीला बाधा पोहचवण्यासंबंधी कायद्याअंतर्गत पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरु केली. पोलिसांची ही वर्तणूक हुकमशाही असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय. केवळ एका पोस्टरवरून एवढी भीती वाटतेय का, असा सवाल आपचे नेते करतायत.
दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी हटाओ, देश बचाओ… असं लिहिलंय. राजकीय रणधुमाळीत प्रत्येक पक्ष एकमेकांविरोधात पोस्टरबाजी करत असतात. मात्र नियमानुसार, संबंधित पोस्टर कुणी छापलंय, त्याचं नाव सार्वजनिक करणं आवश्यक असतं. आपने तर सोशल मीडिया हँडलवरूनही हे पोस्टर्स शेअर केले. दिल्लीतील पोस्टर्सवरून केलेली कारवाई हुकुमशाही असल्याचा आरोप आपने केलाय.
Delhi Police has registered more than 100 FIRs for putting up Anti Modi posters and also arrested 6 people. It is alleged that the van carrying the posters was leaving from the AAP office. pic.twitter.com/AiJxv4gyZL
— Sandeep Panwar (@tweet_sandeep) March 22, 2023
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सदर घटनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत आहे. या पोस्टरमध्ये असं काय आक्षेपार्ह आहे कळत नाही… भारत लोकशाही असलेला देश आहे. मग एका पोस्टरवरून एवढी भीती कशाला? असा सवाल त्यांनी विचारला. हे पोस्टर संजय सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केलंय. तसेच उद्या जंतर मंतरवर याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याच्या या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानहेदेखील सहभागी होतील.