ना विजेची गरज, ना मोठा खर्च, कमी पैशात हवेत गारवा, दिल्लीतील मातीच्या एसीची सगळीकडे चर्चा

| Updated on: May 14, 2021 | 11:40 PM

दिल्लीमध्ये एका आर्किटेक्चरने एक देसी एसी तयार केला आहे. हा एसी पूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आलाय. (monish siripurapu terracotta cooling ac)

ना विजेची गरज, ना मोठा खर्च, कमी पैशात हवेत गारवा, दिल्लीतील मातीच्या एसीची सगळीकडे चर्चा
टेराकोटा एसी
Follow us on

मुंबई : तापमान वाढत असल्यामुळे आजकाल गर्मीसुद्धा जास्तच होत आहे. वातावरणात गारवा राहावा म्हणून लोक मोठ्या प्रमाणात एसीचा वापर करत आहेत. एसीच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन दिल्लीमध्ये एका आर्किटेक्चरने एक देसी एसी तयार केला आहे. हा एसी पूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आला असून त्यामुळे आजूबाजूचे तापमान थंड राहण्यास मदत होत आहे. (Delhi architecture Monish Siripurapu prepared terracotta cooling AC)

माती ही नेहमीच थंड असते. त्यातही मातीवर पाणी टाकले की ती लगेच जास्त थंड होते. हाच गुणधर्म लक्षात घेऊन दिल्ली येथील आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू यांनी मातीपासून एसी तयार करण्याचे ठरवले. त्यांनी अथक प्रयत्न करुन एक एसी तयारसुद्धा केला. त्यांनी या एसीला टेराकोटा कूलर असे नाव दिले आहे. तसेच काहीजण या मातीच्या एसीला बीहाईव्ह एसी असंसुद्धा म्हणत आहेत.

आयडिया कशी सुचली  ?

आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू (Monish Siripurapu) यांना हा मातीचा एसी तयार करण्याची कल्पना 2015 मध्ये सूचली. ते दिल्लीमध्ये एका कारखान्यात गेले होते. तिथे त्यांना अनेक कामगार गर्मीमध्ये काम करताना दिसले. कामगार ज्या ठिकाणी काम करत होते तेथे अतिशय गर्मी होत होती. कारखान्यातील गर्मीमुळे ते तिथे 10 मिनटसुद्धा थांबू शकले नाही. याच कारणामुळे कामगारांना व्यवस्थित काम करता यावे म्हणून त्यांनी एक मातीचा एसी तयार करण्याचे ठरवले. त्यानंतर टेराकोटा कुलरचा जन्म झाला.

आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू यांनी तयार केलेल्या या एसीचा पहिला प्रोटोटाईप 2015 मध्ये नोएडा येथे तयार करण्यात आला. सध्या या एसीचा व्यावसायिक वापर सुरु झालेला नाही. भविष्यात या मातीच्या एसीचा मोठ्या इमारतींमध्ये उपयोग करता येऊ शकतो, असे आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू सांगतात. तसेच या एसीमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. सध्याच्या एसी या विजेवर चालतात. तसेच त्या घराच्या आतील तापमान थंड ठेवत असल्या तरी  बाहेर उष्णता निर्माण करतात. आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू यांनी तयार केलेला टेराकोटा एसी हा अशा प्रकारची कोणतीही उष्णता बाहेर सोडत नसल्याचे ते सांगतात.

टेराकोटा  एसी वातावरणातील तापमानापेक्षा सहा ते सात अंश सेल्सिअस तापमान कमी टेवू शकतो, असा दावा आर्किटेक्चर मोनिष सिरिपुरापू करतात. मोनिष सिरिपुरापू यांच्या तंत्रज्ञानाची दखल संयुक्त राष्ट्रानेसुद्धा घेतलेली आहे. त्यांचा या अविष्काराचा अभ्यास संयुक्त राष्ट्राने केलेला आहे.

इतर बातम्या :

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट ‘अल्लाह-अल्लाह’, नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच

(Delhi architecture Monish Siripurapu prepared terracotta cooling AC)