नवी दिल्ली : दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेला JNU विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालीद (Umar Khalid Gets Bail) याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये त्याच्यावरिरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर अटक झाल्यानंतर उमर खालीद तेव्हापासून अटकेत आहे. दिल्लीच्या कडकड्डुमा न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या पर्सनल बॉन्डवर हा जामीन मंजूर केला आहे. (Delhi court grant bail to former JNU student Umar Khalid who was arrested regarding Delhi riots)
उमर खालीद आणि दिल्ली दंगल प्रकरणात न्यायाधीश विनोद यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी बोलताना “दिल्ली दंगली संदर्भात खालीद याच्या ओळखीच्या काही लोकांना अटक केलेली आहे. मात्र, फक्त याच एका कारणामुळे उमर खालीदला जास्त काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही,” असं न्यायालयानं म्हटलं.
उमर खालीदला 20 हजार रुपयांचा पर्सनल बॉन्ड जमा करावा लागलेला आहे. तसेच जामीन झाल्यानंतर कोणत्याही पुरव्यामध्ये कसल्याही प्रकारचा छेडछान न करण्याची खालीदला ताकीद देण्यात आलेली आहे. बाहेर पडल्यानंतर खालीदला प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहणेसुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. खालीदला आपला मोबाईल नंबर खजुरी खास पोलीस ठाण्याच्या SHO यांना देण्याचेसुद्धा सांगण्यात आले आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे उमर खालीद याला आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅपसुद्धा डाऊनलोड करणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे.
‘Cannot Be Permitted To Remain Behind Bars On The Basis Of Sketchy Material’: Delhi Court Grants Bail To Umar Khalid In A Delhi Riots Case @UmarKhalidJNU,@nupur_0111 https://t.co/53fuTLiXww
— Live Law (@LiveLawIndia) April 15, 2021
नेमका प्रकार काय ?
सीएए-NRC च्या विरोधात 2020 साली दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले गेले. याच आंदोलनादरम्यान 23 आणि 24 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीमध्ये दंगल झाली. याच प्रकरणात लोकांना भडकवल्याचा आरोप ठेवून उमर खालीद विरोधात गुन्हा दाखल खरण्यात आला होता. त्यानंतर उमर खालीद याला अटक करण्यात आली होती.
इतर बातम्या :
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचं नवं युट्यूब चॅनेल सुरू, सत्य सांगणार असल्याचा दावा
(Delhi court grant bail to former JNU student Umar Khalid who was arrested regarding Delhi riots)