नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, जहांगीरपुरीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर आता गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबारात भाजपच्या एका पदाधिकारी ठार झाला आहे. गाझीपूर पोलीस स्टेशन परिसराजवळच भाजपचा पदाधिकारी (BJP leader)जितू चौधरी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. जितू चौधरी (Jitu Chaudhary) यांच्या हत्या (Murder) झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु केले गेले आहे. या हत्यामागे काय कारण आहे हे अजून पोलिसांनी स्पष्ट केले नाही. मात्र लवकरच गुन्हेगारांना आम्ही अटक करु असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले आहे.
जितू चौधरी यांची हत्या झाल्यानंर पोलिसांनी सांगितले की, जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांकडून 6 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे ते मंत्री म्हणून कार्यरत होते.
Delhi | Local BJP leader Jitu Chaudhary shot dead in Mayur Vihar phase-3 around 8:15 pm this evening. Accused absconding. Few empty cartridges & other important evidence recovered from crime scene . Search for eyewitnesses and CCTV footage being done: DCP East Priyanka Kashyap pic.twitter.com/9yYToGfPyn
— ANI (@ANI) April 20, 2022
जितू चौधरी यांची हत्या झाल्याचे समजताच दिल्लीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी आणि घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवला असून सकाळी त्यांच्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सांगितले.
It’s tragic the way he’s been killed…Delhi BJP chief Adesh Gupta also visited here (hospital)…Once MLC is made, body will be shifted; post mortem to be done in morning, then the body will be handed over to family: BJP’s Manoj Kumar on death of local BJP leader Jitu Chaudhary pic.twitter.com/7UZM3qIwxA
— ANI (@ANI) April 20, 2022
जितू चौधरी हे गाझीपूरमध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जात होते. काही दिवसांपासून त्यांचा आणि एका ठेकेदारासोबत आर्थिक देवाण घेवाणीवरुन त्यांचे वाद सुरु होते. त्यामुळे या हत्येमागे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बुधवारी रात्रीसव सव्वा आठच्या दरम्यान त्यांच्यावर अज्ञांताकडून सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यांचा शोध सुरु केला असून आरोपींना लवकरच पकडण्याचा विश्वास पोलिसांनी दिला आहे.
जितू चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली गेली असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या
Pune Crime : कर्नलकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; त्यानंतर कर्नलचीही आत्महत्या