नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) देशासह जगभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी (Eid Celebration) केली जातेय. जामा मशिदीसमोर कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद-उल-फित्रच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवन एकत्र येतात आणि दिल्लीतील जामा मशिदीत (Jama Mashed) नमाज अदा करतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीचं संकट होतं. त्यामुळे राजधानी दिल्लीत मशिदी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुस्लिम बांधवांना साधेपणानंच कोरोना काळात ईद साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र राज्यासह देशातील कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी होते आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळालाय. यावेळी मुस्लिम बांधवांना सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. दोन वर्षानंतर जामा मशिदीत नमाज अदा करण्याची संधी मिळाल्याचं समाधानही यावेळी मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवलंय. अनेकजण आपल्या संपूर्ण कुटुंबासह जामा मशिदीत आले होते.
देशात शांतता नांदावी आणि सगळेच जण एकमेकांशी प्रेमानं, आपुलकीनं वागावेत, यासाठी प्रार्थना केल्यानं एका मुस्लिम बांधवानं एएनआयशी बोलताना म्हटलंय. देशात शांतता नांदावी आणि राजकारण्यांनी धर्माच्या नावावर लोकांना एकमेकांपासून तोडू नये, असं आवाहनही केलंय. दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर जामा मशिद आणि परिसरात तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तांनी ईदच्या पार्श्वभूमीवर करण्याच आलेल्या पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिली आहे. जामा मशिदी आणि आसपासच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करुन ईद शांततेत पार पडली पडली पाहिजे, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याचंही विशेष पोलीस आयुक्त दीप्रेंद्र पाठक यांनी म्हटलंय.
Delhi | Adequate security arrangements have been done in Jama Masjid and nearby places. There is sufficient deployment of police forces. Eid celebrations must be done peacefully, following law and order: Special CP Dependra Pathak pic.twitter.com/Wme22EVEgk
— ANI (@ANI) May 3, 2022
सोमवारी (2 मे) रोजी ईदचा चंद्र दिसला होता. त्यानंतर आज संपूर्ण देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. महिनाभर मुस्लिम बांधवांनी कडक उपवास अखेर सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील आणि राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुस्लिम समजुतीनुसार, ईद अल-फित्र साजरी करणारे इस्लामिक संदेष्टे मुहम्मद हे पहिले होते. काही समजुतीनुसार, मोहम्मद साहेब मक्केत गेल्यानंतर ईद साजरी करण्याची परंपरा मदिना येथे सुरू झाली. जेव्हा मुहम्मद साहब मक्केला पोहोचले, तेव्हा त्यांना लोक दोन दिवस सण मानत असल्याचे आढळले. त्यानंतर मुहम्मद म्हणाले की, अल्लाहने उत्सवाचे दोन दिवस निश्चित केले आहेत. ते म्हणजे ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा. ईद-उल-फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. म्हणून प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोड (शेवई) बनवले जाते. शक्यतो प्रत्येकजण स्वतःसाठी नवीन कपडे आणतो आणि ते परिधान करून ईद साजरी करतो. प्रत्येकजण एकमेकांना ईदी वाटून सुख, समृद्धी आणि बंधुभावाच्या शुभेच्छा देतो.
#WATCH | Devotees offer namaz at Delhi’s Jama Masjid on the occasion of #EidUlFitr pic.twitter.com/OuUt0imWKZ
— ANI (@ANI) May 3, 2022