दिल्लीत लिकर घोटाळ्याचे भूत भाजपाने चांगलेच नाचवले. इतकेच नाही तर त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतरा व्हावे लागले. इतर प्रमुख सहकारी अगोदरच तुरूंगात असल्याने आतिषीच्या हाती प्रमुख पदाची सूत्र द्यावी लागली. अखेरच्या वर्षभरात आपला अंतर्गत विषयातच गुरुफटून ठेवण्यात भाजपा यशस्वी ठरल्याचे दिसून येते. या आणि इतर काही फॅक्टरमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मधील निकालात आपचा ‘दारू’न पराभव झाल्याचे बोलले जात आहे. लिकर घोटाळा, मतदानाला गळती दिल्लीमधील दारू घोटाळ्यात आप सरकार बुडाले म्हटले तर वावगे ठरणार नाही. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या भोवती दारू घोटाळ्याचा फास आवळला. त्यात ईडी पासून इतर तपास यंत्रणांची एंट्री झाली. आपचे अनेक दिग्गज तुरुंगात गेले. त्यात अरविंद केजरीवाल यांचा पण क्रमांक लागला. दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजताच केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. हे सुद्धा वाचा ...