नवी दिल्ली : दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील (Mundka metro station) एका इमारतीला आग लागली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीच्या खिडक्या तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत असताना जेसीबी मशिनच्या साहाय्याने लोकांना खाली आणण्यात आले, तर काही लोक दोरीच्या साहाय्यानेही खाली आले. सध्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 9 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. यासोबतच जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेचीही (Ambulance) व्यवस्था घटनास्थळी करण्यात आली आहे. तर ही आग आज दुपारी 04.45 वाजता लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आग लगाल्याची माहिती मुंडका पोलीस स्टेशनला देण्यात आली. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. तर या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.
#WATCH | Fire near Mundka metro station, Delhi: 1 woman dead in the fire. Rescue operation continues with about 15 fire tenders at the spot, as per DCP Sameer Sharma, Outer district pic.twitter.com/okHUjGE7cn
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 13, 2022
दिल्लीत वाढत्या उष्णतेमुळे सध्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यातच दिल्लीच्या मुडका मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या व्यावसायिक इमारतीला आग लागली. या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही, वायर्स आणि टेक्निकल उपकरणे तयार करण्यात येत असतं. बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर मोठी आग लागली होती. तिथूनच अग्निशमन दलाच्या जवानांनी २० मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीचे स्वरुप मोठे भीषण होते.
दरम्यान प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, ही इमारत तीन मजली आहे आणि सामान्यतः कंपन्यांना कार्यालयासाठी जागा देण्यासाठी वापरण्यात येणारी व्यावसायिक इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या घटनेला सुरुवात झाली. सध्या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 27 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. तर जखमींना तातडीची मदत मिळावीसाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेट्रो स्टेशनच्या पिलर 544 जवळ बांधलेली ही इमारत 3 मजली व्यावसायिक इमारत आहे. जी ऑफिस स्पेस म्हणून कंपन्यांना भाड्याने दिली जाते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि राउटर बनवणारी कंपनी आहे. तेथून आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.