नवी दिल्ली : दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग (Delhi Fire) लागली. या भीषण आगेने देशाला हादरवून सोडले आहे. कारण या आगीत 27 जणांचा (27 Death In Delhi Fire) मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी आम्ही 100 कर्मचाऱ्यांची टीमही तैनात केली आहे. सध्या अग्निशमन विभागाचे पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधमोहीम राबवत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अशीही माहिती दिली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीतील मुंडका येथील आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे. लोकांना बाहेर काढणे आणि जखमींना तत्काळ उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
दिल्ली के मुंडका में आग लगने की घटना बहुत दुःखद है। मैं सम्बंधित अधिकारियों से लगातार संपर्क में हूँ, प्रशासन राहत व बचाव कार्य में जुटा है। NDRF भी वहाँ शीघ्र पहुँच रही है। लोगों को वहाँ से निकालना व घायलों को तुरंत उपचार देना हमारी प्राथमिकता है।
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2022
दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेने दुःखी झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत मनापासून संवेदना आणि जखमींनी लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना. असे ट्विट राहुल गांधी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.
Pained by the tragic loss of lives in the Delhi fire near Mundka Metro station. Heartfelt condolences to the bereaved families and wishing the injured a speedy recovery.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 13, 2022