नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार हे आज समोर येणार आहे. दिल्ली महापालिका निवडणूक होतेय. आज या निवडणुकीचा निकाल आहे. 250 जागांसाठी आप आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय. एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आज जेव्हा मतमोजणी पू्र्ण होईल, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…
आतापर्यंत 145 जागांचे निकाल जाहीर
त्यापैकी 80 जागांवर आप तर 60 जागांवर भाजपाचा विजय
काँग्रेसच्या खात्यात 4 जागा तर अपक्षांना 1 जागा
49 जागांवर आपचा विजय
40 जागांवर भाजपा जिंकली
4 जागा काँग्रेसच्या खात्यात
1 जागेवर इतर अपक्ष विजयी
15 वर्षानंतर भाजपाची सत्ता आम आदमी पार्टी उलथवणार?
दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेवरही आपची सत्ता येण्याकडे वाटचाल
दिल्ली महापालिका निवडणूक निकालात आपची सरशी होण्याची चिन्ह
कादापूर वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आपच्या मुनेश शर्मा यांचा विजय
भाजप उमेदवार उर्मिला राणा यांच्यावर 1200 मतांनी आघाडी
मतमोजणीच्या सध्या झालेल्या फेऱ्यांनुसार, अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष भाजपाच्या पुढे आहे
आम आदमी पार्टीला बहुमत मिळण्यासाठी काही जागांची आवश्यकता आहे
सध्या भाजपा 115, आम आदमी पार्टी 123 आणि काँग्रेस 7 जागांवर पुढे आहे
दिल्ली महापालिका निवडणूक
175 वॉर्डच्या मतमोजणी मध्ये भाजप 106 जागांवर आघाडीवर
आपचे 59 उमेदवार आघाडीवर
काँग्रेसचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर