नवी दिल्ली: दिल्लीच्या मेट्रो लाईनवर आज पहिल्यांदा चालकाविना मेट्रो धावणार आहे. दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईवर जनकपुरी वेस्ट ते बॉटनिकाल गार्डन कॉरिडॉर असा 37 किलोमीटरचा प्रवास ही मेट्रो करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी 11 वाजता या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. इतकच नाही तर आजपासून एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड (NCMC)च्या सेवेचंही उद्धाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. (PM narendra modi inaugurate Indias first driverless metro today)
DMRCने दिलेल्या माहितीनुसार विना चालक मेट्रो धावल्यानंतर दिल्ली मेट्रोचं नावही जगभरातील अग्रणी मेट्रो सेवांमध्ये नोंदलं जाईल. जून 2021 पर्यंत पिंक लाईन म्हणजे मजलिश पार्क ते शिव विहार या मेट्रो मार्गावरील 57 किलोमीटर विना चालक मेट्रो धावण्याची शक्यता आहे. म्हणजे दिल्लीतील चाकरमान्यांना एकूण 94 किलोमीटरचा प्रवास विना चालक मेट्रोतून करता येणार आहे.
नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड म्हणजे NCMC ची सुविधाही मेट्रो प्रवाशांसाठी मोठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्डच्या माध्यमातून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवास करता येणार आहे. 2022 पर्यंत दिल्ली मेट्रोच्या सर्व लाईन्सवर कॉम मोबॅलिटी कार्डद्वारे प्रवासाची सोय होण्याची शक्यता आहे.
मेजेंटा लाईनवर जनकपुरी ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन या मार्गावर सुरु होणाऱ्या विना चालक मेट्रो सेवेमुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोज लाखो प्रवासी कॉरिडॉरवर प्रवास करतात. त्यात आयटी कंपन्या आणि नोयडातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मेट्रो विना चालक असल्यामुळे वेळेचं खास बंधन असेल. त्याचबरोबर कधी उशीर झाला तर वेग वाढवून प्रवाशांना वेळेत त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.
संबंधित बातम्या:
पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणा
ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस
PM narendra modi inaugurate Indias first driverless metro today