नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : उत्तरेकडे पावसाने अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशातील यमुना नदी आणि तिची उपनदी हिंडन नदी ( Hindon River ) हीला आलेल्या पुरामुळे ग्रेटर नोएडा ( Greater Noida ) येथील सुतियाना गावात डपिंग यार्डात उभ्या असलेल्या 350 कार अक्षरश: पाण्यात बुडाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर ( Social Media ) चांगलाच व्हायरल ( Viral Video ) होत आहे.
उतरभारतात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. उत्तर प्रदेशातील यमुनेला आलेल्या पुराने अनेक ऐतिहासिक इमारतींना पुराच्या पाण्याने घेरले आहे. आता ग्रेटर नोएडातील सुतियाना गावात एका कंपनीच्या डपिंग यार्डात उभ्या असलेल्या 350 कार पाण्यात अक्षरश: तरंगत आहेत. सोशल मिडीयावर या गाड्या पुराच्या पाण्यात बुडाल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहीती देताना सांगितले की ईकोटेक – 3 ठाणा क्षेत्रातील पुराना सुतियाना गावात यमुनेची उपनदी हिंडन या नदीला पुर आल्याने तिच्या पुरक्षेत्राती ओला कंपनीच्या कारचे एक डम्प यार्ड आहे. या यार्डाचे केअर टेकर दिनेश यादव यांनी सांगितले की जुन्या तसेच कोरोनाकाळात रिकव्हरी झालेल्या गाड्या येथे उभ्या करण्यात आल्या होत्या. एकूण 350 कार पाण्यात उभ्या आहेत. येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नदीची पातळी वाढल्याने संबंधित कंपनीला यार्ड रिकामे करण्यास सांगण्यात आले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
#WATCH | Noida, UP: Due to an increase in the water level of Hindon River, the area near Ecotech 3 got submerged due to which many vehicles got stuck. pic.twitter.com/a5WOcLCH02
— ANI (@ANI) July 25, 2023
सावधानतेच्या इशाऱ्यानंतरही दुर्लक्ष
या बुडालेल्या कारचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्याने म्हटले आहे की हिंडन नदीच्या पुरक्षेत्रातील हे डंपिंग यार्ड अनधिकृतरित्या बांधलेले आहे. या कंपनीच्या प्रबंधकांना वारंवार इशारा देऊनही त्यांनी येथून कारना हटविले नाही. या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. उत्तर प्रदेशात गंगा नदी, यमुना नदी, शारदा नदी सह अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. दिल्लीतील यमुना नदीची पातळी धोक्याच्या निशाणावरच आहे. त्यामुळे हिंडन या उपनदीचे पाणी देखील वाढले आहे. आता पातळी स्थिर असली तरी धोका कायम आहे. त्यामुळे नोएडा आणि गाजियाबाद येथील अनेक भाग पाण्याच्या पुराखाली आले आहेत. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.