नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी उफाळलेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दिल्ली पोलिसांनी समाजकंटकांना अद्दल घडवण्यासाठी स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी आंदोलक पोलिसांच्या नेहमीच्या लाठ्या सहजपणे अंगावर झेलत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता पोलिसांनी खास स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्या आहेत. (Delhi Police will fight sword-bearing farmers with this Special Steel Lathi)
मात्र, दिल्ली पोलिसांनी याबाबत अधिकृत विचारणा केली असता हे वृत्त नाकारले आहे. प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारात 400 पोलीस जखमी झाले होते. समाजकंटकांनी या पोलिसांना रॉड, तलवार आणि तलवारीने मारहाण केली होती.
अलीपूरचे SHO प्रदीप पालीवाल यांच्यावरही तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे आता पोलिसांनी अशा हत्यारांपासून वाचण्यासाठी स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्याचे सांगितले जाते. शाहदरा जिल्ह्यात पोलिसांनी अशा 50 काठ्या तयार करवून घेतल्याची माहिती आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले होते. आंदोलकांच्या एका गटाने निर्धारित मार्ग सोडून लाल किल्ल्याकडे कूच केले. तेव्हा त्यांना अडवण्यासाठी पोलीस पुढे सरसावले होते.
मात्र, यापैकी काहींनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली होती, लाठीमारही केला होता. मात्र, आंदोलकांची संख्या प्रचंड असल्याने पोलिसांनी माघार घ्यावी लागली होती. अनेक आंदोलक इतके निडरपणे वागत होते की, पोलिसांनी फोडलेली अक्षूधुराची नळकांडी ते हाताने उचलून पुन्हा पोलिसांच्या दिशेने फेकत होते. त्यामुळे दिल्लीच्या आयटीओ आणि लाल किल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संबंधित बातम्या:
(Delhi Police will fight sword-bearing farmers with this Special Steel Lathi)