नवी दिल्ली : मागच्या शनिवारपासून दिल्लीत (Delhi Rain Latest News) जोराचा पाऊस सुरु आहे. अद्याप पाऊस सुरु आहे, पाऊस विश्रांती घेत नसल्यामुळे दिल्लीत काही भागात सगळीकडं पाणीचं पाणी झालं आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून पाऊस विश्रांती घेत पडत आहे. परंतु दिल्लीत (Delhi Rain) सखत भागात सगळीकडं पाणी साचलं आहे. यमुना नदीला पूर आल्यामुळं अनेक रस्त्यांवर पाणी दिसतं आहे. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. दिल्लीतील पूरस्थिती पाहून अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सगळे सरकारी आणि खासगी शाळा बंद (Delhi School Closed News) करण्याचा आदेश दिला आहे.ही माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितली आहे. ज्या भागात पाणी साचलं आहे, त्या भागातील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील.
दिल्लीत अनेक भागात पाणी साचलं असल्यामुळं सिविल लाइंस येथील १० आणि शाहदरा परिसरातील सात शाळा बंद करण्यात येणार आहेत. दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून सिविल लाइंस जोन मधील १० शाळा, शहादरा परिसरातील ६ शाळा आणि शहादरा (उत्तर) भागातील एक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे.
दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. उत्तराखंडमध्ये सुध्दा आज सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पंजाब राज्यात सुध्दा १६ शाळांना पुढचे तीन दिवस शाळा बंद राहणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैंस यांनी ट्विटच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.