नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर आज दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दिल्ली पोलिस महासंचालकांनी शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला पण आम्ही संयम बाळगला, असं पोलिस महासंचालक एस. एन. श्रीवास्तव त्यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस कारवाईचीही माहिती दिली. त्याचबरोबर किती पोलिस कर्मचारी जखमी झाले याची आकडेवारीही सांगितली आहे.(Delhi Police made serious allegations against the farmer leaders)
‘दिल्लीतील हिंसाचारात 394 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकरी नेते आंदोलकांना भरीस घालत होते. त्यांनीच ठरवून दिलेल्या मार्गावरुन ट्रॅक्टर रॅली काढण्यास विरोध केला. शेतकरी नेते आंदोलकांना कशाप्रकारे भरीस घालत आहेत याचे व्हिडीओ पोलिसांकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. गाजीपूरमध्ये राकेश टिकैत यांची टीम बॅरिकेट्स तोडून दिल्लीत घुसले. पोलिसांकडे अनेक पर्याय होते पण आम्ही संयम बाळगला. शेतकरी नेतेही हिंसाचारात सहभागी होते,’ असा गंभीर आरोप पोलिस महासंचालकांनी केलाय. हिंसाचारात पोलिसांच्या 30 गाड्यांचं नुकसान झालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचं श्रीवास्तव म्हणाले.
कोणताही शेतकरी नेता दोषी आढळल्यास त्यांना सोडलं जाणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आमच्याकडे आहेत. आम्ही चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करु. आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आलंय, तर 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
More than 25 criminal cases have been registered by Delhi Police. We are using the facial recognition system and taking the help of CCTV and video footage to identify the accused. No culprit will be spared: Delhi Police Commissioner SN Shrivastava https://t.co/gLmOfI1DqH
— ANI (@ANI) January 27, 2021
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियनने (भानू) आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इथून पुढे ही संघटना या आंदोलनात राहणार नाही. अशा प्रकारे आंदोलन चालत नसतं. इथं कुणाला मार खाण्यासाठी किंवा शहीद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत सरकारसोबत चर्चेला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. टिकैत सरकारसोबत चर्चेला गेले पण त्यांनी तिथे उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला का? त्यांनी धान खरेदीबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडलेत का? आम्ही केवळ पाठिंबा देतो आणि काही लोक नेते बनत आहेत. हे आपलं काम नाही. हिंसेशी आमचं काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.
#WATCH | We have the video footage of those who indulged in the violence & we are analyzing them. They are being identified with the help of the face recognition system. They will be arrested and legal action will be taken against them: Delhi Police Commissioner SN Shrivastava pic.twitter.com/o6X6LSjREy
— ANI (@ANI) January 27, 2021
संबंधित बातम्या :
शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!
दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल
Delhi Police made serious allegations against the farmer leaders