नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेत सहभागी 20 लोकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. शनिवारी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. लाल किल्ल्यावरील व्हिडीओ स्कॅन करुन हे फोटो काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात 200 लोकांचे फोटो प्रसिद्ध केले होते.(Delhi Police releases photos of 20 people in Red Fort violence case)
आम्ही फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि तपास सुरु केला आहे, अशी माहिती एक पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे दिल्ली हिंसाचार झाला नसल्याचा दावा दिल्ली पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केलाय. त्याचबरोबर त्यांनी आरोप केला आहे की, कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅलीसाठी नियोजित मार्गाचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी एकप्रकारे विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप पोलीस आयुक्तांनी केलाय.
Delhi Police release photos of 20 more people who were allegedly involved in the violence at Red Fort on January 26.
(Photo source: Delhi Police) pic.twitter.com/YYJkoHaGl9
— ANI (@ANI) February 20, 2021
दिल्ली पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरुन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली नाही. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे विश्वासघात केला आहे. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या हिमतीनं परिस्थिती आटोक्यात आणली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 152 जणांना अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला शेतकरी संघटनांनी उत्तर दिलं आहे.
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. देशभरातून कोट्यावधी लोक या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. यापैकीच एक असलेली एक व्यक्ती शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी थेट ओडिशातून दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आलीय. ही व्यक्ती एक मूर्तीकार असून त्यांनी हा प्रवास तब्बल 17 दिवस सलग प्रवास करत पूर्ण केलाय. मुक्तिकांत बिस्वाल असं या मूर्तीकाराचं नाव आहे. ते मूर्ती तयार करुन शेतकऱ्यांना आपला पाठिंबा देत आहेत. 32 वर्षीय मुक्तिकांत बिस्वाल ओडिशाचे रहिवासी आहेत.
मुक्तिकांत बिस्वाल आपल्या वडिलांसोबत गावाकडे मूर्ती तयार करुन विकतात. हाच त्यांच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग आहे. जवळपास 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. तसेच हे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करत आहेत. या मागणीला पाठिंबा देत लाखो शेतकरी आपल्या कुटुंबांसह दिल्लीच्या सीमेवर जमा झालेत. या आंदोलनात महिलांचंही मोठं प्रमाण आहे.
संबंधित बातम्या :
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’
अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी
Delhi Police releases photos of 20 people in Red Fort violence case