मुंबई : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा एक नामी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून त्यासाठी नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेकांना कोरोना लस घेण्यासाठी जवळचे लसीकरण केंद्र कोणते आहे, याची माहिती मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात आपल्या जवळचे लसीकरण केंद्र नेमके कसे शोधावे. (detail information of how to find the near Corona Vaccination center on Covin portal)
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र शोधायचे असेल तर केंद्र सरकारने त्यासाठी दोन उपाय उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना लसीकरणाचे सर्व अपडेट https://www.cowin.gov.in/home येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी लसीकरणाच्या संबंधित नंबर, लसीकरणाचे ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
https://www.cowin.gov.in/home या पोर्टलवर जाऊन कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करता येते. त्यासाठी नागरिकांना आपला मोबाईल नंबर, त्यानंतर आधार कार्ड किंवा कोणतेही ओळपत्र लागेल. या ओळखपत्राचा नंबर टाकून नागरिकांना लसीकरणासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन करता येईल.
त्यानंतर https://www.cowin.gov.in/home या पोर्टलवर एक मॅप दिसेल. तसेच बाजूला सर्च ऑप्शनसुद्धा दिसेल. या सर्च ऑप्शनमध्ये गाव, शहर, जिल्हा तसेच राज्याचे नाव टाकून कोरोना लसीकरण केंद्र शोधता येऊ शकते.
https://www.cowin.gov.in/home याशिवाय आरोग्य सेतू अॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्र शोधता येईल. आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली जाऊ शकते. तसेच या अॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्रांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक जिल्हा, राज्य, नगर पंचायत यांच्या वेबसाईट्स तसेच सोशल मीडिया अकाऊंट यावरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या :
VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?
(detail information of how to find the near Corona Vaccination center on Covin portal)