शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचेही नेते, फडणवीस म्हणतात, शिवसेनेचं हे बदलतं रुप!

| Updated on: Oct 14, 2021 | 3:54 PM

शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले आहेत. (devendra fadnavis reaction on shiv sena's dussehra melava in mumbai)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचेही नेते, फडणवीस म्हणतात, शिवसेनेचं हे बदलतं रुप!
devendra fadnavis
Follow us on

पणजी: शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले आहेत. महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत हे शिवसेनेचं बदलतं रुप आहे, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.

देवेंद्र फडणवीस हे गोव्यात आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येणार असं ऐकलं. मला वाटतं हे शिवसेनेचं बदलतं स्वरुप आहे असं समजूया. कारण मजबुरी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत असल्याचं शिवसेना सांगत होती. आता हा प्रयत्न अधिक घट्ट होण्यासाठी असू शकतो, असं फडणवीस म्हणाले.

शहांचा गोव्याला फायदाच होईल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा सरकारी कार्यक्रम जोडून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पक्षालाही मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. अमित शहा यांना मास्टर स्ट्रॅटेजिक मानलं जातं. गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा आजच्या या दौऱ्यामुळे होणार आहे, असं ते म्हणाले. मला महाराष्ट्राचा निवडणुकीमध्ये अधिक जास्त रस आहे. गोवा आणि राज्यातील निवडणुकांसाठी एकत्रित मेहनत घ्यावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

पॅकेज धूळफेक करणारे

काल ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झालेलं पॅकेज म्हणजे धूळफेक आहे. मागे अकरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. ते गेलं कुठे? त्याचे पैसे कुणाला मिळाले?, असा सवाल करतानाच आताही या पॅकेजमधील कुठल्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार आहेत याचीही माहिती नाहीये, असं त्यांनी सांगितलं. हे सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजना बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. बांधावर जाऊन दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना काही देईल असे वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महापालिकेसाठी सज्ज

यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढली तरी काही फरक पडत नाही. आम्ही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. या निवडणुकीसाठी आघाडीने सत्ता आणि पैशाचा वापर केला तरी आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मलिक नैराश्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे केवळ राजकारणासाठी आहे. त्यापलिकडे त्यात वेगळं काही नाही. तसेच नवाब मलिक हे नैराश्यात आहेत. त्यांची निराशा व्यक्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, संभाजी छत्रपतींनी चळवळीचं नेतृत्व करावं; चंद्रकांतदादांचं आवाहन

शिवसेनेची रणरागिणी चाकणकरांच्या मदतीला धावली, मनीषा कायंदेंकडून चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींचं पॅकेज, हर्षवर्धन पाटील म्हणतात, ‘ही तर तुटपुंजी रक्कम!’

(devendra fadnavis reaction on shiv sena’s dussehra melava in mumbai)