राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

| Updated on: May 25, 2024 | 11:05 PM

राज्यात राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचे जुने सहकारी ज्यांना पवारांनी राजकारणात आणलं अशांनीही पवारांची साथ सोडली. अशातच आणखी एका नेत्याने शरद पवारांच्या पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ
शरद पवार
Follow us on

लोकसभा निवडणुकीची सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यावर चार जूनला निकाल लागणार आहे. देशात भाजप विजयाची हॅट्रिक करणार की नाही? एनडीए भाजपच्या विजयीरथाला रोखणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांची आणखी एका नेत्याने साथ सोडली आहे. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

कोण आहे तो नेता?

धीरज शर्मा असं या नेत्याचं नाव आहे. धीरज शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. धीरज शर्मा हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी आता शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

धीरज शर्मा यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये, मी धीरज शर्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे, अशी पोस्ट शर्मा यांनी केलीये. त्यासोबतच धीरज  शर्मा यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.