मुंबई, सध्या सणासुदींमुळे सगळीकडेच उत्साह पाहायला मिळत आहे. या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी (Diwali 2022) साजरी करायची असते, पण कामाच्या ताणामुळे सणाच्या उत्साहावर विरजण पडते. ही समस्या लक्षात घेऊन, यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर, WeWork कंपनीच्या अधिकारी प्रीती शेट्टी यांनी त्यांच्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण 10 दिवसांची सुट्टी (10 days Holliday) जाहीर केली आहे. यावेळी दिवाळीच्या निमित्ताने काम बंद करा आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा, असा जणू आदेशच त्यांनी दिला आहे. यासोबतच ते म्हणाले की, ब्रँड म्हणून आमचे यश हे कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. 10 दिवसांचा दिवाळी ब्रेक प्रत्येक WeWork कर्मचार्यांना रिफ्रेश करण्याचे काम करेल.
या सणासुदीच्या हंगामात, न्यूयॉर्क स्थित ऑफिस स्पेस प्रोव्हायडर WeWork ने आपल्या भारतीय कर्मचार्यांना एक मोठी आणि अनोखी दिवाळी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा ब्रेक देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. या अंतर्गत कर्मचारी आपले काम बंद करून आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करू शकतील असे सांगण्यात आले आहे. आपल्या कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कामातील लवचिकता आणि उत्सवाचा उत्साह वाढवताना हा निर्णय घेण्यात आल्याचे WeWork कंपनीचे म्हणणे आहे. या दिवाळीच्या 10 दिवसांच्या सुट्टीबद्दल बोलताना कंपनीने सांगितले की, कर्मचार्यांना व्यस्त दिनचर्येतून विश्रांती देणे आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. वी-वर्कच्या मते, एम्प्लॉई फर्स्ट या संकल्पनेखाली अशी पॉलिसी 2021 मध्ये पहिल्यांदा आणली गेली.
कंपनीच्या चीफ पीपल आणि कल्चर ऑफिसर प्रीती शेट्टी सांगतात की, आत्तापर्यंतचे 2022 आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण आमचा व्यवसाय मजबूत झाला आहे. ते म्हणाले की ब्रँड म्हणून आमचे यश हे आमच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे.
10 दिवसांची दिवाळी सुट्टी म्हणजे WeWork कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कामासाठी केलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. या निमित्त्याने कर्मचाऱ्यांना आयुष्य रीसेट करण्याची संधी मिळेल.