स्‍वदेशी फायटर जेट तेजसवर इस्त्रायली मिसाईलची यशस्वी चाचणी, शत्रूचा सहज खात्मा

| Updated on: Apr 28, 2021 | 10:47 PM

तेजस या फायटर जेटवर 27 एप्रिल रोजी एअर टू एअर हल्ला करणारी (एएएम) पायथन-5 मिसाईल बसवण्यात आली आहे. (drdo python missile tejas fighter jet)

स्‍वदेशी फायटर जेट तेजसवर इस्त्रायली मिसाईलची यशस्वी चाचणी, शत्रूचा सहज खात्मा
Python
Follow us on

पणजी : पूर्ण क्षमतेने शत्रूचा मुकाबला करण्याच्या उद्देशाने सुरक्षा दल आपल्या मिसाईल्स, लढाऊ विमान तसेच इतर तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल करत आहे. सध्या सुरक्षा दलाने देशाचे स्वदेशी फायटर जेट लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजसला नव्या शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. तेजस या फायटर जेटवर 27 एप्रिल रोजी एअर टू एअर हल्ला करणारी (एएएम) पायथन-5 मिसाईल बसवण्यात आली आहे. या मिसाईलमुळे तेजस या फायटर जेटला अधिक सामर्थ्य प्राप्त झालंय. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट आर्गनायझेशनने (डीआरडीओ) निवेदन प्रसृत करुन ही माहिती दिलीये. (DRDO conducted trial of Israel made Python-5 air to air missile on Tejas fighter jet)

गाव्यात चाचणी पार पडली

तेजसवर बसवण्यात आलेल्या पायथन-5 या मिसाईलबद्दल डीआरडीओने सविस्तर माहिती दिली आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार पायथन या मिसाईलला गोवा येथे तेजस या फायटर विमानार बसवण्यात आलं. तसेच येथे त्याची टेस्ट करण्यात आली. या चाचणीदरम्यान तेजसवर बसवण्यात आलेल्या पायथन मिसाइलने निश्चित केलेले लक्ष्य यशस्वीरित्या भेदले. पायथनने निश्चित लक्ष्य 100 टक्क्याने भेदल्यामुळे या मिसाईलबद्दलच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. डर्बी मिसाईल्समध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि वाढवलेली क्षमता यांची परीक्षा करण्यासीठी तेजसवर या मिसाईल्सना बसवण्यात आलं होतं, असं डिआरडीओने सांगितलं.

याआधी बंगळुरुमध्येही चाचण्या

गोवा येथे प्रत्यक्ष चाचणी करण्याआधी डीआरडीओने या मिसाईल्सची चाचणी बंगळुरु येथे केली होती. यावेळी तेजस जेटमध्ये मिसाईलचे इंटीग्रेशन तसेच अवॉनिक्‍स, फायर कंट्रोल रडार, मिसाईल वेपन डिलीव्हरी सिस्‍टम आणि फ्लाईट कंट्रोल सिस्‍टम या सर्व बाबींची चाचणी करण्यात आली.

पायथन मिसाईल काय आहे ?

पायथन-5 वर 1990 मध्ये काम सुरु करण्यात आलं. जून 2003 मध्ये पॅरिस एअर शोमध्ये पहिल्यांदा या मिसाईलला सर्वांसमोर आणण्यात आलं. यावेळी या मिसाईलने सर्वोत्तम प्रदर्शन करत निश्चित लक्ष्य यशस्वीपणे भेदले होते. 2006 च्या ऑगस्टमध्ये लेबनॉनमझ्ये झालेल्या युद्धाच्या दरम्यान पायथन-5 चा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पायथन-5 या मिसाईलला लॉकहीड मार्टिन च्या एफ-35 लाईटनिंग II या फायटर जेट्सवर बसवण्याचा विचार इस्त्रायलचा आहे.

मिसाईलचं वाजन 105 किलो, 3.1 मिटर लांबी

पायथन-5 ही मिसीईल 3.1 मीटर लांब असून त्याचे वजन 105 किलोग्रॅम आहे. ही मिसाईल 11 किलोग्रॅमपर्यंत वजन असलेल्या स्फोटकांना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकते. पायथन-5 मध्ये नवी इलेक्‍ट्रो-ऑप्टिकल इन्फ्रारेड सिस्टीम आहे. ज्यामुळे या मिसाईलची क्षमता आणखी वाढलेली आहे. या मिसाईलमध्ये बसवण्यात आलेले इनफ्रारेड हे टर्गेटला स्कॅन करुन धोका शोधते. तसेच नंतर टार्गेटला लॉक करुन त्यावर हल्ला करण्यासाठी मदत केली जाते. दरम्यान, पायथन मिसाईल्सला टेस्ट केल्यामुळे आणि या मिसाईल्सच्या यशस्वी परीक्षणामुळे डीआरडीओने समाधान व्यक्त केलं आहे.

इतर बातम्य :

भारताच्या मदतीसाठी कॅनडाही धावला; सुमारे 74 कोटी रुपये देणार

मोठी बातमी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मोठा निर्णय, भारताला कोरोना लसींचा पुरवठा?

Oscars 2021: बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, ‘ब्लॅक पँथर’ला मागे टाकत ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

(DRDO conducted trial of Israel made Python-5 air to air missile on Tejas fighter jet)