आयएएस ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घरदार सोडून मुलं परराज्यात शिकायला जातात. राजस्थानातील कोटा आणि दिल्ली सारख्या कोचिंग क्लासची महागडी फि भरुन पालक मुलांना आएएस करायचं यासाठी आयुष्यभराची कमाई दावणीला लावत असतात. दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये जोरदार पावसाने पाणी भरल्याने क्लासमधून बाहेर पडता न आल्याने तीन मुलांचा हकनाक बळी गेला आहे. तुम्ही म्हणाल नैसर्गिक संकटात सरकार तरी काय करणार ? परंतू क्लासला मंजूरी कशी काय दिली. बेसमेंटमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग नसताना कोचिंग सेंटर कसे चालविले जाते ? या हलगर्जीला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे.
टीव्हीवर बातम्या लागलेल्या. त्यात आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचे समजल्याचे श्रेया यादव यांचे काका धर्मेंद्र यादव यांनी म्हटले आहे. धर्मेंद यादव रात्रीच उत्तर प्रदेशातून दिल्लीत पोहचले परंतू त्यांच्या लाडक्या भाचीचा मृतदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. दिल्लीच्या राव आयएएस स्टडी सेंटरमध्ये त्यांची भाची श्रेया यादव आयएएसची तयारी करीत होती. दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर हे कोचिंग सेंटर आहे. स्टडीसेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने दोन विद्यार्थीनींचा आणि विद्यार्थ्यांना मृत्यू झाला आहे. मृतांत युपीतील आंबेडकर नगरात राहणारी श्रेया यादव हीचा देखील समावेश आहे. ही बातमी टीव्हीवर पाहून त्यांच्यावर आभाळच कोसळलं. श्रेयाला भावी आयएएस होणारच या त्यांच्या आशेवर पावसाच्या पाण्याने आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा बुलडोझर फिरला आहे. तिच्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बरसावा हाशिमपूर गावात मातम पसरला आहे.
तिचं शव मिळालेले नसल्याने काका धर्मेंद्र यादव यांना ही बातमी खोटी ठरावी ही आशा होती. परंतू जेव्हा मृतांची यादी त्यांच्या हाती लागली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही मोठ्या आशेने श्रेया हिला दिल्लीला पाठविले होते.ती नक्की आयएएस होणारच अशी आम्हाला आशा होती. कारण ती खूप हुशार होती असे अश्रू ढाळत धर्मेंद्र यादव सांगत होते. आता क्लासेस सेंटरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. एनडीआरएफने अनेक मुलांना वाचविले परंतू तीन होतकरु विद्यार्थ्यांचा सिस्टीमने बळी घेतलाच असे धर्मेंद्र यादव म्हणाले…