Garba : गरबा खेळायचाय? मग गोमूत्र प्या, नाहीतर…, भाजपच्या या जिल्हाध्यक्षांचे म्हणणे तरी काय?

| Updated on: Oct 01, 2024 | 9:05 AM

Navratri Garba : गरबा पंडाल, मंडपात महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलेल्या युक्तीने वादाचा भडका उडाला आहे. गरबा खेळायचाय, तर मग अगोदर गोमूत्र प्या, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. त्यावरून आता राजकारण तापलं आहे.

Garba : गरबा खेळायचाय? मग गोमूत्र प्या, नाहीतर..., भाजपच्या या जिल्हाध्यक्षांचे म्हणणे तरी काय?
भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने तुफान
Follow us on

नवरात्रीच्या नवरंगांमध्ये आता राजकारणाचा अजून एक रंगाची भर पडली आहे. नवरात्रीत गरबा खेळण्याचा आनंदच काही और. गरबा खेळण्यात गैरहिंदूचे प्रमाण वाढले आहे. या गैर हिंदूंना अटकाव करण्यासाठी इंदोरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी सुचवलेल्या एका युक्तीने वादाचा भडका उडला आहे. त्यांच्या मते, गरबा पंडालमध्ये प्रवेशासाठी प्रत्येकाला गोमूत्र द्यावे. तरच त्या व्यक्तीला पंडाल, मंडपमध्ये प्रवेश द्यावा. हिंदूला गोमूत्र पिण्यात कुठलीही आक्षेप नाही. इतरांना त्याची अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांनी सर्वच गरबा मंडळांना ही युक्ती सूचवली आहे. आजकाल आधार कार्डात बदल करणे आणि नाव, पत्ता, धर्म बदलणे ही सोपी गोष्ट असल्याचे, बोगस आधार कार्ड तयार करणे सोपे असल्याचे ते म्हणाले. अनेक परधर्मीय स्वतःची ओळख लपवून धर्म परिवर्तनासाठी गरब्याचा वापर करत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यावर त्यांनी गोमुत्राचा उपाय सुचवला आहे.

गोमुत्राशिवाय नो एंट्री

गरबा पंडालमध्ये गोमूत्र पाजल्याशिवाय, ते ग्रहण केल्याशिवाय कुणालाच एंट्री देऊ नये, असा सल्ला चिंटू वर्मा यांनी दिला. गरबा पंडलामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी हे विधान केले आहे. हिंदू व्यक्तींनी गरबा खेळायला येताना हिंदू संस्कृतीनुसार पेहराव, गंध-तिलक लावूनच प्रवेश करावा असे आवाहन त्यांनी केले. हिंदू गायीला माता मानतात, त्यामुळे गोमूत्र पिणे हिंदूसाठी अडचणीचे नाही. पण गरबा मंडपात इतर धर्माचे लोक येऊन संस्कृतीला धक्का लावत आहेत. महिलांच्या सुरक्षेला धोका पोहचवत असल्याने वर्मा यांनी हा उपाय सुचवला आहे.

हे सुद्धा वाचा

कुणाला आक्षेप घेण्याचे काय काम?

हिंदू संस्कृतीनुसार, पेहराव करण्यात आणि वागण्यात कुणाला काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांनी मंडपात येण्यापूर्वी गोमूत्र जरूर घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यात कुणाला आक्षेप घेण्याचे काय काम? असा रोकडा सवाल त्यांनी केला. पितृपक्ष आता संपणार आहे. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यातील अनेक राज्यात गरबा खेळण्यात येतो. त्यामुळे हिंदूंनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी होण्याचे आवाहन चिंटू वर्मा यांनी केले आहे. गरबा मंडळात इतर धर्मीय महिलांशी छेडछाड करण्याचे प्रकार वाढल्याने त्यावर अंकुश ठेवण्यासाठी वर्मा यांनी गोमूत्र पाजण्याचा उपाय सुचवल्याचा दावा केला आहे.