नवी दिल्लीः सध्या सण समारंभ आणि लग्नसराईचा हंगाम आहे. तर दुसरीकडे हिवाळ्याची प्रचंड थंडी असल्याने खाद्यतेलासह अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्यची शक्यता आहे. दिल्लीतीस बाजारात तेलबिया, तेल, मोहरी, सोयाबीन आणि कापसाच्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आली. तर दुसरीकडे, भुईमूगाची बाजारपेठेत आवक वाढले आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला असून तेल-तेलबिया आणि सीपीओ आणि पामोलिनचे भाव पूर्वीच्या दराएवढेच राहिले आहेत.
मलेशिया आणि शिकागो एक्स्चेंजचे घसरलेली स्थिती असूनही देशातील अनेक मंडईमधून आवक वाढली असल्याने आणि हिवाळा असल्याने भुईमूग तेल तसेच तेलबियांचे भावही पूर्वी इतकेच राहिले आहेत.
पामोलिन तेलाच्या स्वस्त दरामुळे भारतासह परदेशातही पामतेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे चार-पाच महिन्यांपूर्वीच पामोलिन तेलाचा भाव हा प्रतिटन 2,150 डॉलर इतका होता, तर तोच दर आता 1,060 डॉलर प्रति टन इतका खाली आला आहे. त्यामुळेही मागणीही वाढली आहे.
तसेच कोरोनाच्या महामारीनंतर विवाह समारंभही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळेही मागणी वाढली आहे. त्यामुळेच बहुतांश खाद्यतेल-तेलबियांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
खाद्यतेल-तेलबियांच्या संदर्भात सरकारने स्टॉक धारण मर्यादा रद्द केली आहे. त्यामुळे खाद्यतेल उद्योग, शेतकरी आणि किरकोळ व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.
असेच पाऊल उचलत सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीसाठी 20 लाख टन कोटा प्रणाली काढून टाकण्याची मागणीही सरकारकडे करण्यात आली आहे.
यामुळे आयात वाढणार असून त्यामुळे तेलाच्या किंमतीही खाली येतील अस मतही व्यापारी वर्गातून व्यक्त केले जात आहे.