नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : मतदान करणे (Casting Vote) हा भारतीय नागरिकांचा हक्क आणि जबाबदारी आहे. भारतात निवडणुका हा एक सोहळाच असतो. तो जणू सणासारखा साजरा होतो. देशात पंचवार्षिक निवडणुकांचा (Election) कार्यक्रम असला तरी कानकोपऱ्यात निवडणुका सुरुच असतात. त्यामुळेच सध्या एक देश, एक निवडणुकीचे पडघम वाजत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवरील भार एकदम हलका होण्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात त्यासाठी घटनात्मक तरतूदींचा आढावा घ्यावा लागणार आहे. या घडामोडीत आणखी एक बातमी येऊन धडकली आहे. आता मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये कपात होणार असल्याचा मॅसेज व्हायरल झाला आहे. अनेक नागरिकांना हा संदेश आला आहे. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहे. काय आहे या मॅसेजमागील सत्य?
काय आहे मॅसेज
लोकसभा निवडणुका पुढील वर्षी, 2024 मध्ये होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास नागरिकांच्या बँक खात्यातून 350 रुपये कपात होतील, असा मॅसेज व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा मॅसेज धुमाकूळ घालत आहे. आधार कार्ड आधारे मतदान न करणारे समोर येतील आणि त्यांच्या खात्यातून रक्कम कपात होईल, असा दावा करण्यात येत आहे.
क्या लोकसभा चुनाव में मतदान नहीं किए जाने पर बैंक अकाउंट से कटेंगे 350 रुपए❓
जानें वायरल ख़बर की सच्चाई❕#PIBFactCheck:
🔶 यह ख़बर #फ़र्ज़ी है।
🔶 @ECISVEEP ने ऐसा कोई निर्णय नहीं लिया है।
🔶 जिम्मेदार नागरिक बनें, मतदान अवश्य करें!!
🔗 https://t.co/8EwXdkIPlF pic.twitter.com/ikFLUndfCh
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 15, 2023
काय आहे प्रकरण
वृत्तपत्राचे कात्रण जोडत हा मॅसेज व्हायरल करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे बँक खाते नसेल, त्यांच्या मोबाईल रिचार्जमधून अथवा इतर योजनांमधून ही रक्कम कपात करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या मॅसेजमध्ये निवडणूक आयोगाला टार्गेट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने यासाठी अगोदरच न्यायालयाची परवानगी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक आहेत. आता मतदान ओळखपत्राशी पण आधार कार्ड जोडण्यात आले आहे. ज्यांनी मतदान केले नाही, त्यांची माहिती जमा करुन खात्यातून 350 रुपये कपात करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
PIB ने सांगितली सत्यता
पत्र सूचना कार्यालयाने (PIB) या मॅसेजचे फॅक्ट चेक केले. त्याची तपासणी केली. त्याची सत्यता तपासली. PIB नुसार हा मॅसेज पूर्णपणे खोटा आहे. निवडणूक आयोगाने पण या मॅसेजची दखल घेतली आहे. हा मॅसेज पूर्णपणे खोटा असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नाही. कोणाच्या ही खात्यातून 350 रुपये कपात करण्यात येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तर पीआयबीने मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले आहे.