आर्ट्सवाल्यांकडे बघून नाकं मुरडणाऱ्या इंजिनीयरिंगवाल्यांनो आधी हे वाचा…

| Updated on: Oct 10, 2022 | 6:09 PM

अभियांत्रिकीसाठी आता फक्त विज्ञानाचे ज्ञान पुरेसे नाही, तर कला (Arts) या विषयाचाही त्यांना अभ्यास करावा लागणार आहे.

आर्ट्सवाल्यांकडे बघून नाकं मुरडणाऱ्या इंजिनीयरिंगवाल्यांनो आधी हे वाचा...
Follow us on

मुंबईः इंजिनीअरिंग करणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी देण्यात आली आहे. अभियांत्रिकीसाठी आता फक्त विज्ञानाचे ज्ञान पुरेसे नाही, तर कला (Arts) या विषयाचाही त्यांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण कलेशिवाय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) या देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी या संस्थेचे हे हणणे आहे. ही शिक्षणातील ही पोकळी भरून काढण्यासाठी आयआयटी बॉम्बेने HASMED अभ्यासक्रमाची नवीन संकल्पना मांडली आहे.

ही संकल्पना नेमकी काय आहे? त्याची अंमलबजावणी कशी होणार? या अंतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये कोणत्या विषयांचा समावेश होणार आहे? याचाही तपशील आयआयटी बॉम्बेकडून देण्यात आला आहे.

HASMED म्हणजे काय? वेगवेगळ्या विषयांच्या नावांसाठी ही एक छोटी ठो प्रकार आहे. या अंतर्गत, BE/BTech सारख्या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांना 6 प्रमुख विषय जोडण्यात आले आहेत. ते विषय पुढील प्रमाणे;

H-ह्युमॅनिटीज
A-कला
S- सामाजिक विज्ञान
M-व्यवस्थापन
E-उद्योजकता
D-डिझाइन

आयआयटी बॉम्बेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रम/अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या 6 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे.

हे नॉन-इंजिनीअरिंग विषय असले तरी अभियांत्रिकी करत असताना त्यांचे महत्त्व खूप जास्त आणि महत्वाचे आहे.

आयआयटी व्यवस्थापनाकडून माहिती सांगातान म्हटले आहे की, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन, वित्त, सल्लागार, स्टार्ट-अप यासारख्या इतर गैर-अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये करिअर करणे ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे.

नवीन ट्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून अभ्यासक्रमात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता इथे फक्त विज्ञान विषय चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयआयटी बॉम्बेकडून अभ्यासक्रम सुधारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचे संयोजक प्रोफेसर किशोर चॅटर्जी यांनी सांगितले की, इंजिनीअरिंगचे तीन प्रकारचे विद्यार्थी असून त्यामध्ये स्पेशालिस्ट, जनरलिस्ट, सुपर जनरलिस्ट अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे.