चष्म्याचा नंबर घालविण्याचा दावा करणाऱ्या एका आय ड्रॉपला भारतीय बाजारात उतरविण्यापूर्वीच बंदी आली आहे. कंपनीने असा दावा केला होता की या आय ड्रॉपने नजरेचा चष्मा दूर होण्यास मदत मिळेल. भारतीय औषध नियामक एजन्सीने या आय ड्रॉपला मंजूरी देखील दिली होती. परंतू आता CDSCO ने मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हे आजार दूर करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपवर नोटीसीला उत्तर मिळेपर्यंत बंदी घातली आहे.
मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबई स्थित एन्टोड ( ENTOD) फार्मास्यूटिकल्स या कंपनीने PresVu नावाने एक आयड्रॉपची निर्मिती केली होती. याच्या नियमित वापराने नजरेचा चष्मा दूर होऊ शकतो असे म्हटले जात होते.
सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी (SEC) द्वारा आधी या उत्पादनाची शिफारस केल्यानंतर ENTOD फार्मास्यूटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI)अंतिम मंजूरी देखील दिली होती. परंतू या कंपनीने आपल्या आय ड्रॉपच्या (1.25% पिलोकार्पाइन w/v) अशा प्रकारच्या भ्रामक दावा करण्याच्या प्रचाराची दखल घेत नियामक संस्थेचा पुढील आदेश मिळत बंदी घातली आहे.
या आय ड्रॉप कंपनी सोशल मिडिया आणि अनधिकृत प्रचारामुळे या आय ड्रॉपने चष्मा लावणाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या आय ड्रॉपच्या असुरक्षित उपयोग आणि जनतेच्या सुरक्षेबाबत नियामक एजन्सीचे टेन्शन वाढले.कारण या आय ड्रॉपला डॉक्टरांचे
प्रिस्क्रिप्शन असेल तर देण्याची मंजूरी मिळाली होती. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध मिळणार होते. परंतू त्याची जाहीरात अशी केली गेली जसे प्रत्येकजण याचा वापर करून आपला चष्म्याचा नंबर घालविण्याचा प्रयत्न करेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रिस्क्रिप्शन-आधारित या आय ड्रॉप्सची 350 रुपयांना मेडीकल फार्मसीत विक्री होणार होती.