नवी दिल्ली, दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) एक मोठी माहिती हाती आली आहे. आता या हत्त्या प्रकरणात नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. तपासासंदर्भात महाराष्ट्रातील वसईला पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबचे वडील अमीन पूनावाला (Amin Punawala) दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. श्रद्धाचे 2020 चे तक्रार पत्र समोर आल्यानंतर, दिल्ली पोलिसांना संशय आहे की अमीन पूनावाला त्याचा मुलगा आफताबच्या सतत संपर्कात होता. यादरम्यान त्याने आफताबला श्रद्धाबद्दल का विचारले नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी आफताब जेव्हा पॅकर्स अँड मूव्हर्स एजन्सीद्वारे वसईहून दिल्लीला आपले सामान हलवत होता, तेव्हा तो त्याच्या घरी वडील आणि कुटुंबीयांना भेटायला गेला होता. त्याच्या वडिलांनी सामान हलवण्यात मदत केली का, याचा तपास सुरू आहे.
श्रद्धाचे पत्र समोर आल्यानंतर आफताबच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती नव्हती का? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. कारण तो सतत आपल्या मुलाच्या वाईट सवाईंना पाठीशी घालत होता.
दिल्ली पोलिस ड्रग्जच्या अँगलनेदेखील तपास करत आहेत, कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यासाठी तो वसई, मीरा रोड आणि भाईंदरच्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता. सध्या न्यायालयाने आफताब अमीन पूनावाला याला शनिवारी 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हत्येनंतर आफताबच्या घरी आलेल्या महिलेचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.