नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दसरा-दिवाळीच्या तोंडावरच मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. त्यांना केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात अपेक्षित वाढ झाल्याने आज कर्मचाऱ्यांची स्वारी खुशीत आहे. केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआरमध्ये वाढीला मंजूरी देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी पण महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत, रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे.
DA आणि DR मध्ये वाढ
केंद्राने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा दिला. डीए आणि डीआरमध्ये वाढ केली. यामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे डीए आणि डीआर 46 टक्के झाला. दोन्ही जुलै महिन्यापासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढ करण्याची शक्यता होती. महागाईच्या आकड्यांनी भत्त्यात वाढ करण्यात आली.
इतक्या कर्मचाऱ्यांना झाला फायदा
महागाई भत्यात वाढ झाल्याने सणावारापूर्वीच कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा झाला. देशातील केंद्र सरकारच्या 47 लाख कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख पेन्शनर्सला त्याचा फायदा होईल. डीएमधील वाढ 1 जुलै 2023 पासून प्रभावी असेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांन नोव्हेंबर महिन्यातील वेतनात जुलै आणि ऑक्टोबरमधील थकबाकी पण मिळेल. वाढत्या महागाईत या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्राहक निर्देशांकात वाढ
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधारे केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करते. महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होते. AICPI इंडेक्समध्ये तेजी आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मधील महागाई भत्त्यात 3.87% अतिरिक्त फायदा होईल. महागाई भत्ता 45 टक्के होण्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 28 सप्टेंबर रोजी महागाई भत्ता वाढविण्याची विनंती करण्यात आली होती.
वेतनात होईल इतकी वाढ
महागाई भत्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 36,000 रुपये आहे. तर त्याचा डीए 15,120 रुपयांच्या जवळपास असेल. त्यात 4 टक्के वाढ झाल्यास डीए 16,560 रुपये होईल. म्हणजे प्रत्येक महिन्यात 1440 रुपयांची वाढ होईल. पूर्ण वर्षांचा विचार करता डीएच्या रुपाने 17,280 रुपयांची वाढ होईल.